शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये खांदेपालट
By admin | Published: May 12, 2017 01:49 AM2017-05-12T01:49:03+5:302017-05-12T01:50:58+5:30
नाशिक : शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्तालय स्तरावरील आस्थापना मंडळाने प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये पोलीस आयुक्तालय स्तरावरील आस्थापना मंडळाने प्रशासकीय कारणास्तव खांदेपालट केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. म्हसरूळ, इंदिरानगर, सातपूर, उपनगर, मुंबई नाका या पोलीस ठाण्यांमध्ये नव्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावताना प्रशासकीय कालावधी तसेच काही वैयक्तिक कारणास्तव आलेले विनंती अर्ज आणि नवीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती अशा कारणास्तव शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खांदेपालट गुरुवारी (दि.११) करण्यात आली. म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेचे सुभाषचंद्र देशमुख, नियंत्रण कक्षामध्ये असलेले पोलीस निरीक्षक फुलदाय भोये, वाहतूक शाखेचे राजेश आखाडे यांची सातपूरच्या गुन्हे शाखेत तर सुनील नंदवाळकर यांची मुंबई नाका, मुंबई नाक्याचे मंगलसिंग सूर्यवंशी यांची भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे. भद्रकालीचे पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांची दहशतवाद विरोधी पथकामध्ये उपनगरचे (गुन्हे) पोलीस निरीक्षक देवराज बोरसे
यांची सायबर पोलीस ठाण्यात तर नियंत्रण कक्षामधील बाजीराव महाजन यांची उपनगर पोलीस ठाण्यात आणि उपनगरचे अशोक भगत यांची विशेष शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे.