निफाड येथे खंडेराव महाराज यात्रौत्सव उत्साहात
By admin | Published: February 10, 2017 10:45 PM2017-02-10T22:45:52+5:302017-02-10T22:46:08+5:30
आकर्षक रांगोळीने वेधले भाविकांचे लक्ष : बारा गाड्या ओढण्याचे ड्रोन कॅमेराने चित्रीकरण
निफाड : निफाड येथे आयोजित खंडेराव महाराज यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्र म मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले. सकाळी श्री खंडेराव महाराज मंदिरात संपन्न झाली त्यानंतर मांडव डहाळ्याची मिरवणूक शनी मंदिरापासून काढण्यात आली.
सकाळी 10 वाजता कादवा नदी किनारी असलेल्या श्री खंडेराव महाराज पादुका मंदिरापासून कावडीची मिरवणूक काढण्यात आली दुपारी श्री खंडेराव महाराज देवतांचे पूजन करण्यात आले तसेच श्री मारु ती मंदिर येथे होम हवन करण्यात आले या मिरवणुकीच्या अग्रभागी जि.प शाळां 1 आण ि2 च्या विद्यार्थ्यांचे झान्ज पथक ।आण िलेझीम पथक होते वाद्याच्या तालावर झान्ज पथकातील आण िलेझीम पथकातील भगवा फेटा बांधलेले विद्यार्थी ताल धरत होते या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे फवारणी यंत्राद्वारे पिवळा भंडारा उधळण्यात येत होता त्यामुळे ही मिरवणूक पिवळ्या भंडार्याने न्हाहून निघाली होती या मिरवणुकीत कावडीधारकांच्या खांद्यावर सजवलेल्या कावड्या होत्या निफाड येथील माउली ग्रुप चे सदस्य आण िवैनतेय शिशुविहारच्या विद्यार्थ्यांनी श्री खंडेराव महाराज , बानुबाई ,म्हाळसा यांची वेशभूषा केली होती सफेद रंगाच्या अश्वाने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले हि मिरवणूक निफाडमधील महत्वाच्या मार्गावरून काढण्यात आली कावडी मिरवणुकीने निफाडकरांचे लक्ष वेधले
होते .
सायंकाळी शिवाजी चौकात 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्र म झाला श्री खंडेरावाचे भगत रमेश शेलार यांनी 12 गाड्या ओढल्या याप्रसंगी निफडकरांनी प्रचंड गर्दी केली होती यात्रा कमिटीच्या वतीने 12 गाड्या ओढण्याच्या कार्यक्र माचे चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापर करण्यात आला ज्या नागरिकांना गर्दीमुळे 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्र म पाहणे शक्य होत नाही त्यांच्या साठी 10 बाय 12 च्या टीव्ही पडद्यावर 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्र म पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती खंडेराव महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.