गोंदे दुमाला येथील खंडेराव महाराज यात्रौत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 05:00 PM2021-04-11T17:00:56+5:302021-04-11T17:01:37+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील मुख्य ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यात्रौत्सवाचे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामस्थांच्या वतीने उत्साहाच्या वातावरणात आयोजन करण्यात येते. परंतू यावर्षी पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्वच यात्रौत्सव रद्द करण्यात आल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा महाराज यात्रोत्सव यावर्षी ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे उपसरपंच परशराम नाठे व मंदिराचे मुख्य पूजारी संजय नाठे यांनी सांगितले. मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.

इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील प्रसिद्ध असलेले खंडेराव महाराज यात्रौत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करीत रद्द करण्यात आला असून दरवर्षी यादिवशी गावातून खंडोबा महाराजांच्या मुर्तीची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात येते. घरोघरी गोडधोड मिष्टान्नाचे पदार्थ बनवले जातात. त्याचप्रमाणे पुरणपोळीचा नैवैद्य खंडोबा महाराज यांना दाखवण्यात येतो.
त्याचप्रमाणे यात्रौत्सवानिमित्त गावामध्ये भक्तीमय वातावरण असते. तसेच जागरण गोंधळ सारख्या कार्यक्रमांसह इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या खंडेराव महाराज यात्रोत्सव काळात केले जाते. यात्रेच्या मुख्य दिवशी गोंदे दुमाला गावाचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबा महाराज यांच्या मुर्तीची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात येते.
या मिरवणूकीमध्ये शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येते. तसेच या मिरवणूकीचे मुख्य आकर्षण म्हणजे या मिरवणूकीमध्ये परिसरातील अनेक अश्वप्रेमी आपले अश्व घेऊन सहभागी होत अश्वांच्या नृत्यविष्काराच्या जुगलबंदीचा कार्यक्रम करण्यात येतो. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच परिसरातून अनेक भाविक गर्दी करत असतात.
परंतू यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा यात्रौत्सव बंद करण्यात आल्यामुळे सर्वच कार्यक्रमांना भाविक मुकणार आहेत. मिरवणूक संपल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने खंडोबा महाराज यांना मुख्य पुजा-यांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन नैवैद्य दाखवण्यात येतो. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातुन देखील आलेले भाविक मनोभावे दर्शन केल्यानंतर आपली मनोकामना पुर्ण होण्यासाठी खंडोबा महाराज यांच्या चरणी लोटांगण घालतात.
यानंतर संध्याकाळी भाविकांसाठी जागरण गोंधळाच्या माध्यमातून मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. परंतू यावर्षी हे यात्रौत्सवात साजरे केले जाणारे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे भाविकांना यापासून मुकावे लागणार असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
(११ नांदूरवैद्य १, २)
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जागरण गोंधळाचे कार्यक्रम स्थगितकोरोनाच्या पार्श्वभुमीवर जागरण गोंधळाचे कार्यक्रम स्थगित