मनेगाव येथे खंडेराव महाराज यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 06:21 PM2019-12-04T18:21:57+5:302019-12-04T18:23:31+5:30

सिन्नर : तालुक्यातील मनेगाव येथील ग्रामदैवत खंडेराव महाराजांचा दोन दिवसीय यात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ चा जयघोष करीत हजारों भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सोमवारी रात्री पावणेआठ च्या सुमारास बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म पार पडला.

 Khanderao Maharaj Yatra in Manegaon | मनेगाव येथे खंडेराव महाराज यात्रा उत्साहात

- सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील खंडेराव महाराज.फोटो क्र.- 04२्रल्लस्रँ05फोटो ओळी- सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवातील मुकूट मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक.

Next
ठळक मुद्देआमदार माणिकराव कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. दोन दिवसीय यात्रोत्सवात पहिल्या दिवशी सकाळी सहा वाजता यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश सोनवणे, उपाध्यक्ष संपत शिंदे, मनेगावच्या सरपंच स्वप्नाली सोनवणे, धोंडवीनगरच्या सरपंच सुनिता शिंदे यांच्या हस्ते पूजन करण्यात



सनईच्या सुरात व ढोलताशांच्या गजरात कावडीधारकांचे आगमन झाले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष रमेश सोनवणे, उपाध्यक्ष संपत शिंदे, यात्रा कमिटी सदस्यांनी कावडीधारकांचे स्वागत केले.यात्रेत मनेगाव-धोंडवीरनगरसह परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली. कुलदैवताच्या दर्शनासाठी नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक झालेले चाकरमाने सहकुटूंब दाखल झाल्याने घरोघरी आनंदाचे वातावरण होते. संपूर्ण गावात रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.यात्रा कमिटीच्यावतीने कावडीधारकांना टोपी-टॉवेलचे देण्यात आले. यावेळी यात्रा कमिटी सदस्य बाळासाहेब सोनवणे, शिवाजी सोनवणे, विजय आंबेकर, जगन खोळंबे, अरु ण मडके, संजय सोनवणे, सुहास जाधव, बाळू सोनवणे, रामनाथ सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, अरु ण सोनवणे, संपत शिंदे, सुभाष शिंदे, राजाराम मुरकुटे, नाना शिंदे, रामा बुचुडे, नितीन शिंदे, सोपान सोनवणे, परसराम सोनवणे, त्र्यंबक सोनवणे, रवींद्र सोनवणे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.चौकट-कुस्त्यांच्या दंगलीने यात्रोत्सवाची सांगता दरम्यान, दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता भव्य कुस्त्यांच्या दंगलीने यात्रोत्सवाची सांगता झाली. यावेळी नाशिक, नगरसह लगतच्या जिल्ह्यांतील नामवंत पहिलवानांनी हजेरी लावली. ५१ रुपयांपासून १५ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती. यात्रोत्सव शांततेत पार पाडणेकामी सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात्रा कमिटीने उत्तम नियोजन करुन संपुर्ण यात्रा शांततेत पार पाडली. त्याबद्दल ग्रामस्थांनी यात्रा कमिटीचे आभार मानले. रात्री नऊ वाजता देवासमोर जागरणाचा कार्यक्रम झाला. तसेच मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला.
खंडेराव महाराज यात्रोत्सवाची सांगता
 

Web Title:  Khanderao Maharaj Yatra in Manegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.