कोरोनाचे नियम पाळत चंदनपुरीत खंडेराव यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:02+5:302021-02-05T05:48:02+5:30
मंदिरात सकाळी जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक सुनील गायकवाड, ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य विनोद शेलारसह सर्व सदस्य यांच्या ...
मंदिरात सकाळी जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सतीश पाटील, नगरसेवक सुनील गायकवाड, ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य विनोद शेलारसह सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत कृषिमंत्री दादा भुसे, अनिता भुसे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यंदा कोरोनामुळे महसूल प्रशासनाने यात्रोत्सवास परवानगी नाकारली आहे. हजारो नागरिक यात्रेत नतमस्तक होत असल्याने परवानगी मिळाली नसली तरी चंदनपुरीत पारंपरिक छोट्या प्रमाणात मंदिर प्रशासनाने सर्व धार्मिक विधी पूर्ण केले. सोमवारी (दि. २५) सकाळी जेजुरी येथून मोजक्याच मल्हार भक्तांच्या उपस्थितीत मशाल ज्योत चंदनपुरीत दाखल झाली. छोटेखानी मिरवणुकीने ज्योत खंडेराय मंदिरात आणली गेली. मंगळवारी पौष पौर्णिमाच्या मुहूर्तावर खंडोबा मंदिरात काकड आरतीसह इतर धार्मिक विधी मुख्य पुजाऱ्यांनी केले. चंदनपुरीत जमलेल्या मल्हार भक्तांनी बेल, भंडारा, खोबरे वाढवून पूजन केले. तळी भरणे, वाघ्या मुरळी, काठी नाचवणे आदी विधी करण्यात आले. भंडारा उधळणमुळे चंदनपुरी मंदिर परिसर सोनेरी रंगाने झळाळून गेला होता.
इन्फो
केवळ पूजा साहित्याची दुकाने
यंदाच्या वर्षी ग्रामपंचायततर्फे कोणत्याही व्यावसायिकांना दुकाने थाटण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यात्रेत केवळ पूजा साहित्य, भंडारा यांची काही अंशी दुकाने लावण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेतील मनोरंजनास मल्हार भक्त कोरोनामुळे मुकणार आहे. संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्या आहेत. ग्रामपंचायततर्फे मुलभूत सुविधा व पोलीस प्रशासनातर्फे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त करण्यात आला असल्याचे जय मल्हार ट्रस्टचे अध्यक्ष सचिव बुवाजी पाटील यांनी सांगितले.
फोटो फाइल नेम : २८ एमजेएएन ०६ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनपुरी यात्रेनिमित्त मंदिरात महापूजा करताना कृषिमंत्री दादा भुसे, अनिता भुसे.
फोटो फाइल नेम : २८ एमजेएएन ०७ . जेपीजी
फोटो कॅप्शन : खंडेराव मंदिर परिसरात यात्रोत्सवानिमित्ताने तळी भरताना उपस्थित मल्हार भक्त.
===Photopath===
280121\28nsk_32_28012021_13.jpg~280121\28nsk_33_28012021_13.jpg
===Caption===
फोटो कॅप्शन बातमी सोबत आहे.~फोटो कॅप्शन बातमी सोबत आहे.