अंदरसूल येथे खंडोबाचा जागर

By admin | Published: December 17, 2015 11:42 PM2015-12-17T23:42:35+5:302015-12-17T23:43:27+5:30

३० वर्षांनंतर ओढण्यात आल्या बारागाड्या

Khandoba Jagar at Insurgulas | अंदरसूल येथे खंडोबाचा जागर

अंदरसूल येथे खंडोबाचा जागर

Next

 अंदरसूल : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले मार्तंडभैरव खंडोबाचा उत्सव अंदरसूल येथील खंडोबा मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गेल्या सहा दिवसांपासून येथील मंदिरात मार्तंडभैरव षड्रात्रोस्तव आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रतिदिन जागर करण्यात आला. चंपाषष्टीच्या दिवशी या मंदिरातून दुपारी ४ वाजता पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या
उत्साहात पार पडला. सुमारे २५-३० वर्षांनंतर बारागाड्या ओढण्यात
आल्या, अशी चर्चा उपस्थितांत
होती.
प्रसंगी परिसरातील छोट्या-मोठ्यांनी एकच गर्दी केली होती व खंडोबाचा जयघोष करण्यात
आला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
वरखेडा येथे रथयात्रा
दिंडोरी : तालुक्यातील वरखेडा येथे खंडेराव महाराज यात्रोत्सवास प्रारंभ झाला असून, कावडीधारकांनी आणलेल्या गोदावरी जलाने मूर्तीस अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या पुजारी चंद्रभागा भागवत यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
महिलांनी यावेळी रथाचे औक्षण केले. यात्रोत्सवात दुपारनंतर नवसपूर्ती करण्यात आली. परिसरातील भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पुजारी सचिन भागवत यांनी बारागाड्या ओढल्या. रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाला. (वार्ताहर)

Web Title: Khandoba Jagar at Insurgulas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.