पिंपळगावचा खंडोबा महाराज यात्रौत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 10:48 PM2021-02-23T22:48:22+5:302021-02-24T00:50:20+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील दि. २७ फेब्रुवारी साजरा होणारा ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रौत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी रद्द करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचे सरपंच देविदास देवगिरे यांनी सांगितले. मुख्य पुजारी यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात येणार आहे.

पिंपळगाव घाडगा येथील प्रसिद्ध असलेला खंडोबा महाराज यात्रौत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा. गावातून खंडोबा महाराजांच्या मूर्तीची हारफुलांनी सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात यायची. मिरवणुकीमध्ये गावातील एका भाविकाकडून बारा बैलगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असायचे. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातून तसेच परिसरातून अनेक भाविक आवर्जून हजेरी लावायचे. लोककलेच्या माध्यमातून मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कुस्त्यांची दंगल व्हायची. त्यामुळे गावात पाच दिवस भक्तीमय वातावरण असायचे. मात्र यंदा कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे शासनाच्या आदेशानुसार हा यात्रौत्सव रद्द करण्यात आला आहे.
यावर्षी यात्रौत्सवातील सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे भाविकांमध्ये नाराजी दिसून येत येत आहे.