खंडोबा यात्रोउत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 05:49 PM2019-12-03T17:49:55+5:302019-12-03T17:51:10+5:30
अंदरसुल : येथे खंडोबा मंदिरात सकाळी चपासष्टी निमित्ताने खंडोबा महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दुपारी गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक ...
ठळक मुद्देअंदरसुल : बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र मा भाविकांची गर्दी
अंदरसुल : येथे खंडोबा मंदिरात सकाळी चपासष्टी निमित्ताने खंडोबा महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून दुपारी गावातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
गावात ठिकठिकाणी पालखीचे नागरिकांनी पूजन केले त्यानंतर संध्याकाळी ६ वाजेला बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक उत्सव साजरा करण्यात आला. बारागाड्या ओढताना भक्तांनी जय मल्हार, जय मल्हार व बोल सदानंदाचा येळकोट आणि खंडोबा महाराजांचा जयघोष करीत उत्सव साजरा केला.
सोमवारी (दि.२) खंडोबाच्या मंदिर परिसरात भव्य यात्रा संपन्न झाली येथील खंडोबा भक्तांनी बारागाड्या ची परंपरा जतन केली आहे.