खांदवे गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:17 AM2021-09-21T04:17:41+5:302021-09-21T04:17:41+5:30
जहागीरदार खेडकर यांचा भव्य वाडा होता. त्यांनी वाड्यातीलच एका कोपऱ्यातील जागा देण्याचे मान्य केले आणि याठिकाणी एक छोटेसे ...
जहागीरदार खेडकर यांचा भव्य वाडा होता. त्यांनी वाड्यातीलच एका कोपऱ्यातील जागा देण्याचे मान्य केले आणि याठिकाणी एक छोटेसे लाकडी बांधणीचे मंदिर तयार झाले. त्यात अखंड काळ्या पाषाणातून कोरलेले कमळ आणि त्यावर गणेशाची जेमतेम १० इंच स्थानापन्न मूर्ती तयार झाली. अनेक वर्षे या मूर्तीला शेंदराचे लेपन करण्यात येत असल्याने मूर्ती दिसणे कठीण होते; मात्र ४० वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्याचवेळी शेंदराचे लेपन दूर करण्यात आले. त्यामुळे गणरायाच्या आकर्षक मूर्ती आणि कलात्मकतेचे दर्शन घडले. काही वर्षांपूर्वीच खांदवे कुटुंबीयांनी चांदीचे कवच तयार करून घेतले असून ते गणेश चतुर्थी, संकष्टी, अंगारकी वगैरे विशेष दिनी ते मूर्तीवर बसवण्यात येते. खांदवे गणपतीचे परिसरात नवसाला पावणारा सिद्धिविनायक म्हणून इतके महत्त्व वाढले की, केवळ भाविकच नव्हे तर निवडणुकीच्या वेळी राजकीय पक्षांचे उमेदवार देखील त्याला साकडे घालत.