खोटी आश्वासने देणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 01:09 AM2017-07-26T01:09:18+5:302017-07-26T01:09:31+5:30
पाटोदा : विखरणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून अक्षयप्रकाश योजना सुरू होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाअधिकारी वर्गाने मात्र पुन्हा एकदा सहा गावाना ठेंगा दाखवला आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : विखरणी येथील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून अक्षयप्रकाश योजना सुरू होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून असताना विज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने मात्र पुन्हा एकदा सहा गावाना ठेंगा दाखवला आहे . शक्य असूनही अक्षयप्रकाश योजना सुरु करत नाही यामुळे विखरनी आणि परिसरातील युवक सकाळी १० वाजता येवला ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आल्याने चांगलाच पेच निर्माण झाला . एक दोन नाहीतर चक्क सहा खोटे पत्र देणाऱ्या तिनही अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी ठाम भूमिका पंचायत समिती गटनेते मोहन शेलार यानी घेतल्यावर पोलीच निरीक्षक भापकर यानी लेखी फिर्याद घेतली ,चौकशी करु ण गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिल्यावर सर्व युवकानी पोलिस स्टेशन सोडले. २१ नोव्हेंबर , १० मार्च, २० में असे सलग तीनदा पंचायत समिती सदस्य मोहन शेलार व सहकाऱ्यां आमरण उपोशन केले होते. रास्तारोकोचा इशारा दिला होता,मात्र प्रत्येक वेळेस विज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गाने खोटे पत्र देऊन जनतेची दिशाभूल केली,दि.२४ में रोजी विज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन महीन्यात अक्षयप्रकाश योजना सुरु करतो असे लेखी पत्र गावकऱ्यांना दिले होते. त्याला दोन महीने दिनांक २४ रोजी पूर्ण झाले तरी या बेजबाबदार अधिकारी वर्गला या कामाची आठवण राहिली नाही. सदर कामाची कोणत्याही प्रकारची निविदा निघालेली नसताना देखील कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यानी निविदा निघाल्याचे खोटे पत्र उपोषणकर्त्यांना दिले होते. दी २४ मे रोजी मालेगांव मंडल चे अधीक्षक अभियंता शैलेन्द्र राठोड, मनमाड चे कार्यकारी शैलेश कुमार यांच्या आदेशानुसार प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यानी दोन महीने मुदतीत अक्षय प्रकाश योजना सुरु करतो असे लेखी पत्र दिले होते. तीन दिवस उपोषण सुरु असल्याने परिसरातील गावातील वातावरण गंभीर झाले होते. विधान परिषद आमदार जयंत जाधव, जेष्ठ नेते अंबादास बनकर, शिवसेना नेते संभाजी पवार, पोलिस निरीक्षक ाापकर , बाळासाहेब लोखंडे यानी मध्यस्थि करु ण दोन महीन्याचे लेखी पत्र देऊन उपोषण सोडले होते, मात्र तरीही या अधिकारी वर्गानेगांभीर्य ठेवले नाही, विधान परिषद आमदार जयंत जाधव यानी पावसाळी अधिवेशनात विखरनी अक्षयप्रकाश योजनेचा तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. आज सकाळी दत्तू नाइकवाडे, माणीक निकम, गणेश पाटिल, तुकाराम तनपुरे, जगन तनपुर, अशोक कोताडे, श्रावण गायके, गोकुळ लोहाकरे, समाधान तनपुरे, हनुमान गुंजाल, योगेश महाले, संदीप गायके,शंकर गायके,शिवाजी निकम,यसह असंख्य कार्यकर्ते हजर होते,