खापर्डे, पळसुले यांची मैफल रंगली

By admin | Published: January 31, 2016 10:53 PM2016-01-31T22:53:00+5:302016-01-31T23:00:23+5:30

संगीत सभा : सरवटे यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम

Khaparde, Palsule's concert played | खापर्डे, पळसुले यांची मैफल रंगली

खापर्डे, पळसुले यांची मैफल रंगली

Next

नाशिक : ऋग्वेद संस्थेच्या वतीने दिवंगत सरवटे बुवा यांच्या स्मरणार्थ आयोजित संगीत सभेत पं. प्रसाद खापर्डे यांचे गायन व पं. रामदास पळसुले यांचे तबलावादन रंगले. पं. खापर्डे यांनी पुरिया रागाने गायनाला प्रारंभ केला. ‘पिया गुणवंता’ ही विलंबित एकतालातील बंदिश घेऊन त्यांनी रागाचा हळुवारपणे स्वरविस्तार केला. मंद्र सप्तकातील षडज् आणि मध्य सप्तकातील आलाप व बोलआलापाने त्यांनी पुरिया खुलवला. त्यांनी द्रुत तीनतालात ‘मोरे चतुर पिया’ ही बंदिश सादर केली. त्यांच्या सेहवासान घराण्याची खासियत असणारी ‘जलद सरगम’ तिन्ही सप्तकांत सहजतेने गात रसिकांना आगळा आनंद दिला. त्यानंतर मिश्र काफी रागात ‘कृपा करो महाराज’ ही सुफी ढंगाची ठुमरी सादर केली. सुभाष दसककर यांनी संवादिनीची साथ केली. प्रमोद भडकमकर यांनी उत्तम तबला साथ करून मैफलीची उंची वाढवली. दुसऱ्या सत्रात पं. रामदास पळसुले यांनी तबलावादन पेश केले. त्यांनी तीनतालातील मिश्र चतुर्थ जातीचे पेशकार व फरुखाबाद, दिल्ली घराण्याचे कायदे पेश केले. बारटक्के व पुष्पराज भागवत यांनी त्यांना साथ केली. संस्थेच्या कार्यवाह अर्चना भडकमकर यांनी प्रास्ताविक केले. नीलेश रोटे यांनी सूत्रसंचालन केले. अमेय चितळे यांनी आभार मानले.

Web Title: Khaparde, Palsule's concert played

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.