त्र्यंबकेश्वर तालुक्यात खरीप शेती धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:49 PM2020-07-22T21:49:42+5:302020-07-23T00:58:04+5:30
त्र्यंबकेश्वर : गेल्या १५ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून खरीप शेती धोक्यात ाली आहे. काही ठिकाणी शेतकरी अन्य व्यवसायाकडे वळाले आहेत.
त्र्यंबकेश्वर : गेल्या १५ दिवसांपासून त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतीची कामे खोळंबली असून खरीप शेती धोक्यात ाली आहे. काही ठिकाणी शेतकरी अन्य व्यवसायाकडे वळाले आहेत. तालुक्यातील नागली हे या भागातील बळीराजाचे आवडते खाद्य. पण पावसाअभावी नागली रोपे पिवळी पडत आहे. काहींची भात लावणी खोळंबली आहे. वास्तविक श्रावण महिन्यात पावसाचा जोर जास्त असतो. मागील वर्षी याच काळात पावसाने तालुक्याची सरासरी ओलांडली होती. पेरणीची बरीच कामे आटोपली होती.
यावर्षी ऐन श्रावण महिन्याच्या पूर्वार्धात पावसाने दडी मारली आहे. दहा ते पंधरा मिनिटे पाऊस पडतो आणि त्यानंतर ऊन पडते. पावसाची ही रोजचीच अनिश्चितता झाली आहे. कधी कधी तास अर्धा तास पाऊस पडतो, त्यानंतर गायब होतो. पावसाने काही ठिकाणी नागली रोपांना दिलासा मिळाला आहे.
भात पिकाची खोळंबलेली लावणीची कामे मार्गी लागली आहेत. शेतीच्या कामांना दिलासा मिळून वेग आला आहे. सुमारे तासभर पाऊस पडल्याने शेतीची अडकलेली कामे सुरू होतील; पण पावसाचे हे सातत्य असेच असणे गरजेचे आहे.
अन्यथा कामाला सुरुवात झाली खरी; पण तासभर पाऊस पडून नंतर उघडल्याने एक दोन दिवसांनी पुन्हा शेतकऱ्यांनी आकाशाकडे नजरा लावायच्या. वास्तविक या भागातील शेतीच मुळी लहरी निसर्गावर अवलंबून आहे.
---------------
लागवडीचा खर्चही निघत नसल्याने चिंता
नाशिक - त्र्यंबक रस्त्यावरील तसेच तालुक्यातील इतर शेतकरीही आपली शेती विकून इतर धंद्याला लागले आहेत. कारण शेती करून उत्पन्न मिळत नाही. लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे काही शेतकरी म्हणतात. शेती व्यवसाय अनिश्चित झाला आहे. निदान तालुक्यात
दोन ते तीन मोठे प्रकल्प असते तर तालुक्यातील बरीचशी शेतजमीन निदान ओलिता खाली येऊन
बागायती शेती करता आली असती. अर्थात तालुक्यात जेथे जेथे पाण्याची कायमस्वरूपी सोय आहे तेथे बागायती पिके, भाजीपाला, रब्बी पिके बाराही महिने शेतकरी घेत असतात.