परतीच्या पावसामुळे खरीप संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 02:23 PM2019-10-26T14:23:40+5:302019-10-26T14:24:10+5:30
देवगाव : परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे.
देवगाव : परतीच्या पावसाने शेतीवरील संकट वाढले असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. पावसामुळे उभ्या पिकांच्या काढणीस उशिर होत असल्यामुळे व सोंगून ठेवलेली पिके खळ्यावर आणता येत नसल्याने पिंकाना कोंब फुटू लागले आहे. खरीप पिकांवरील संकटे थांबता थांबेनात. जुन-जुलै महिन्यात पावसाची गरज असतांना पावसाने ओढ दिली. परंतु पिके काढण्याची वेळ आली तर पाऊस थांबता थांबेना. परिसरातील द्राक्षांसारखी महागडे पिके यावर्षी घ्यावीत किंवा सोडुन द्यावीत असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. मका पिकांवर लष्करी अळींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीकामाचे संपुर्ण वेळापत्रकच या पावसामुळे कोलमडलेले आहे. काढणीस आलेली पिके सतत पडत असलेल्या पावसामुळे वाया जाणार असल्याचे चिन्ह निर्माण झाली आहे. त्यामुळे शेकर्यांचे नुकसान होणार आहे. मान्सुन संपल्यानंतरही पावसाचा दणका कायम आहे. खरीप पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातुर आहेत. परिसरामध्ये सुरु असलेल्या पावसामुळे शेतीकामाचे नियोजन बिघडले असुन शेतीमालाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत आहे.