जाखोरीत खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:34 AM2019-05-28T00:34:08+5:302019-05-28T00:34:24+5:30
शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी पंधरवडा प्रचार व प्रसार कार्यक्रम रविवारी (दि.२६) राबविण्यात आला.
एकलहरे : शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी पंधरवडा प्रचार व प्रसार कार्यक्रम रविवारी (दि.२६) राबविण्यात आला.
उद््घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी विश्वास कळमकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक कृषी अधिकारी रणजित आंधळे, संतोष कापाळे, सीमा बोठे, जयश्री कुवर, अशोक धात्रक, कचरू कळमकर उपस्थित होते.
नाशिक तालुका पूर्व भागातील जाखोरी येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व सोयाबीन शेतीशाळा कार्यक्र म राबविण्यात आला. रणजित आंधळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे, म्हणून कृषी विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. विविध योजना व त्यांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी महिती दिली.
सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, माती नमुना घेण्याचे प्रात्यक्षिक, बिजप्रक्रि या प्रात्यक्षिक, क्र ॉपसॅप विषयक माहिती, मक्यावर येणाºया अमेरिकन लष्करी अळीचा बिमोड, शेतकरी अपघात विमा, उन्हाळ्यात फळबागा वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनांंची माहिती देऊन, प्रत्येक शेतकºयाने प्रत्येक पिकाचा विमा काढण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर कांदाचाळ, यांत्रिकीकरण, शेततळे, गांडूळ व कंपोस्ट खत युनिटविषयी सहायक कृषी अधिकारी रणजित आंधळे, संतोष कापाळे, सीमा बोठे, जयश्री कुवर यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी अशोक धात्रक, कचरू कळमकर, कारभारी खाडेसर, सोपान जगळे, गणपत जाधव, कोंडाजी ताजणे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.