येवल्यात ७४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:13 AM2021-05-22T04:13:44+5:302021-05-22T04:13:44+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ७४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ७४ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी
होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली. येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक
असलेल्या मका, सोयाबीन, कापूस या पिकांबरोबरच खरीप
हंगामासाठी येवला तालुक्यात ७३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागातर्फे पेरणी निश्चित करण्यात
आली आहे. शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीसाठी
लगबग सुरू झाली
असून, कोरोनाने ग्रामीण भागातील अर्थचक्र बिघडले आहे. खते, बियाणांसाठी भांडवलासाठी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी खरीप हंगामावर शेतकऱ्यांची पुढील गणित अवलंबून असल्याने सध्या ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, फनणी, शेणखत पसरविणे तन गोळा करणे या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली आहे.
येवला तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात ७३ हजार ९३० हेक्टरवर खरीप पिकांचे कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून, ३९ हजार १६९ हेक्टरवर मका, आठ हजार ९०८ हेक्टरवर कापूस, तर ६ हजार ६८२ या मुख्य पिकांच्या पेरणीबरोबर बाजरी, तूर, मूग, भुईमूग, उडीद या पिकांचे नियोजन करण्यात आले आहे.
----------------------
येवला तालुक्यातील खरीप हंगामातील संभाव्य क्षेत्र ॲक्टरमध्ये
बाजरी - ८,७३३,मका - ३९,१६९, तूर - ४४२, मूग - ७,१७३, सोयाबीन - ६,६८२ कापूस - ८,९०८, भुईमूग - २,६३३, उडीद - १९०
अशी एकूण ७३,९३० हेक्टर
---------------
येवला तालुक्यात यावर्षी १२४ गावांमध्ये बाजरी, मका, मूग, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, उडीद असे एकूण ७,३९३० हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे. या विविध पिकांचे उत्पादनवाढीसाठी बीजप्रक्रिया, बीबीएफनी पेरणी, १० टक्के रासायनिक खताची बचत करणे, जमीन आरोग्यपत्रिकाप्रमाणे खताचा वापर करणे ही मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजना आपल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात राबवाव्यात व आपले उत्पादन वाढण्यास हातभार लावावा.
- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी, येवला