दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:28 PM2020-06-20T17:28:17+5:302020-06-20T17:30:12+5:30

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्गचक्र ीवादळानंतर पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतातील पेरणीला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरु वात केली आहे.

Kharif sowing completed in Dindori taluka | दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण

दिंडोरी तालुक्यात खरीप पेरणी पूर्ण

Next
ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी द्विधा अवस्थेत

लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात निसर्गचक्र ीवादळानंतर पावसाला सुरवात झाल्यानंतर शेतातील पेरणीला वेग आला आहे. दिंडोरी तालुक्यात सध्या खरीप पेरणीचे काम जोरात सुरू आहे. मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावल्याने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरु वात केली आहे.
तालुक्यातील पूर्व भागात दोन दिवसात पूर्ण पेरण्या उरकतील असे दिसत आहे. तालुक्यात खरीप हंगामात सोयाबिन, मूग, भुईमूग, उडीद, तूर वरई भात ही पिके घेतली जातात. मात्र यावर्षी शेतकऱ्यांनी भुईमुग, सोयाबीन या पिकांना पसंती दिलेली दिसते. परंतू वरूणराजाने पाठ फिरवली असून शेतकरी द्विधा अवस्थेत सापडला आहे.
तालुक्याचा पश्चिम पट्टा पूर्णत: पावसावर अवलंबून असतो. त्यामुळे हलवी भाताच्या रोप टाकण्यात येत असून भुईमुग लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात होती. मात्र, आता टमाटा पिक कमी प्रमाण होऊन सोयाबीन व भुईमुग याकडे शेतकºयांचा कल मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिंडोरी तालुक्यात बळीराजाला खरीपाच्या पेरणीसंदर्भात तालुका कृषी विभाग सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकºयांना सोयाबीन व खताची माहिती उपलब्ध करून देत आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीमुळे शेतकरी वर्ग आपल्या गावातील कृषी सेवा केंद्र दुकानातून बी-बियाणे खरेदी करीत असून गर्दी न करता विशेष काळजी घेत आहे.

Web Title: Kharif sowing completed in Dindori taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.