७४ हजार हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:11+5:302021-06-06T04:12:11+5:30

खरीप पेरणी हंगाम तोंडावर आला आहे. मुख्य व नगदी पीक म्हणून मका, सोयाबीन, कापूस या पिकांना खरीप हंगामात ...

Kharif target on 74,000 hectares | ७४ हजार हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट

७४ हजार हेक्टरवर खरिपाचे उद्दिष्ट

googlenewsNext

खरीप पेरणी हंगाम तोंडावर आला आहे. मुख्य व नगदी पीक म्हणून मका, सोयाबीन, कापूस या पिकांना खरीप हंगामात पसंती असते. तालुक्यात ७३ हजार ९३० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यासाठी शेतकरी वर्गाची पेरणीपूर्व मशागतीची लगबग सुरू आहे. कोरोनाने या लाटेत ग्रामीण भागाला विळखा घातल्याने यंदा ग्रामीण भागाचे अर्थचक्र बिघडले आहे. खते, बियाणे यासाठी भांडवलाची जमवाजमव करताना शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरीप हंगामावर शेतकर्‍यांची पुढील आर्थिक गणित अवलंबून असल्याने सध्या ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी, फणणी, शेणखत पसरविणे, तण गोळा करणे आदी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

तालुक्यात ३९ हजार १६९ हेक्टरवर मका, ८ हजार ९०८ हेक्टरवर कापूस, ६ हजार ६८२ सोयाबीन या मुख्य पिकांबरोबर बाजरी, तूर, मूग, भुईमूग, उडीद आदी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवणक्षमता यावर मार्गदर्शन केले जात आहे.

गेल्यावर्षी झालेल्या सततच्या पावसाने तसेच कांदा रोप कमतरतेने रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा लागवड उशिरा झाली. पालखेड डावा कालवा लाभक्षेत्र व तालुक्यातील इतर ठिकाणीही कांदा काढणीला उशीर झाला. परिणामी शेतजमीन शेकल्याच गेल्या नाहीत. त्याचा विपरीत परिणाम खरीप पिकावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इन्फो

टमाटा लागवडीवर भर

तालुक्यात गेल्यावर्षी टमाटा लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती, मात्र टमाट्याला भाव चांगला मिळाला. त्यामुळे यावर्षी शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात टमाटा लागवडीसाठी नर्सरीमध्ये रोपे बुक केली आहेत. तर तालुक्यात टमाटा लागवड क्षेत्रात या हंगामात वाढ होणार असल्याचे चित्र आहे.

इन्फो

संभाव्य क्षेत्र हेक्टरमध्ये

बाजरी- ८७३३

मका- ३९,१६९

तूर - ४४२

मुग - ७११३

सोयाबीन- ६६८२

कापूस - ८९०८

भुईमूग - २६३३

उडीद- १९०

एकूण ७३,९३०

कोट...

येवला तालुक्यातील १२४ गावांमध्ये बाजरी, मका, मूग, सोयाबीन, कापूस, भुईमूग, तूर, उडीद असे एकूण ७३ हजार ९३० हेक्टरवर खरीप हंगामात पेरणी होणे अपेक्षित आहे. या विविध पिकांचे उत्पादनवाढीसाठी बीजप्रक्रिया, पेरणी, रासायनिक खताची बचत, जमीन आरोग्यपत्रिकाप्रमाणे खतांचा वापर यासाठी विशेष मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे.

- कारभारी नवले, तालुका कृषी अधिकारी

फोटो- ०५ येवला कृषी

सातारे (ता. येवला) येथे बीज प्रात्यक्षिके दाखविताना कृषी सहायक साईनाथ कालेकर व प्रकाश जवणे आदी.

===Photopath===

050621\05nsk_44_05062021_13.jpg

===Caption===

फोटो- ०५ येवला कृषी सातारे (ता. येवला) येथे बीज प्रात्यक्षिके दाखवितांना कृषी सहाय्यक साईनाथ कालेकर व प्रकाश जवणे. 

Web Title: Kharif target on 74,000 hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.