युथ क्लबच्या सदस्यांनी उचलला खारीचा वाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:31+5:302021-06-04T04:12:31+5:30
दुसऱ्या लाटेच्या अगदी सुरुवातीला मार्च महिन्यापासून लोकांसाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल सामग्री आणि महत्त्वाची औषधे इत्यादींची माहिती ...
दुसऱ्या लाटेच्या अगदी सुरुवातीला मार्च महिन्यापासून लोकांसाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल सामग्री आणि महत्त्वाची औषधे इत्यादींची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ह्या सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीचा लाभ शेकडो गरजूंना झाला. गेल्या एक महिन्यापासून नाशिक जिल्हा रुग्णालय येथे रोज संध्याकाळी २५०पेक्षा जास्त लोकांना फूड पॅकेट सोबत बिस्कीट पुडा आणि पाणीवाटप केले जात आहे. याच काळात अनेक कुटुंबांसाठी १५ दिवसांची किराणा सामग्री, धान्य, वस्तू आणि गरजू साहित्य वाटपसुद्धा करण्यात आले. आतापर्यंत शंभराहून अधिक कुटुंबांना त्यांनी साहित्य पुरवून मदतीचा हात दिला. नाशिक युथ क्लबच्या या कार्यात रविराज लभडे पाटील, अमोल कासार, ऋषिकेश पाटील, सुमित रायते, वैशाली कांकरिया, अंकिता अहिरे, ओमेश सोनार, राज ठाकूर, सागर काळकर, अभिषेक दुसाने, गौरव सूर्यवंशी, लक्ष्मीकांत ठाकरे आदी सहभागी आहेत.
चौकट==
नाशिक युथ क्लबच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, शेतकरी आणि सुशिक्षित लोकांनी भरभरून मदत केली आहे. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, संस्था, संघटना आणि समाजमाध्यमं नाशिक युथ क्लबच्या कार्याला पाठिंबा देऊन प्रोत्साहित करत आहेत.