खरवंडीला झोपडीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:14 AM2021-03-07T04:14:33+5:302021-03-07T04:14:33+5:30
महादेव वाडी येथे असलेले चव्हाण कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुलीच्या लग्नाची तयारी करून ...
महादेव वाडी येथे असलेले चव्हाण कुटुंब मजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. पंधरा दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुलीच्या लग्नाची तयारी करून सर्व धान्य-किराणा त्यांनी आपल्या झोपडीत भरून ठेवला होता. गुरुवारी (दि.५) दुपारी दोन वाजता सर्व कुटुंब शेतमजुरी करण्यासाठी बाहेर गेले असता अचानक झोपडीला आग लागून त्यात संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच येवला पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन संतोष निवृत्ती चव्हाण व त्यांच्या कुटुंबाला धीर दिला. गावकऱ्यांनाही त्यांनी मदतीचे आवाहन केले. यावेळी सरपंच जगन मोरे, सदस्य रवींद्र दाणे, सोपान मोरे, विलास मोरे, दशरथ मोरे, विठ्ठल मोरे, शिवाजी चव्हाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी आर. एस. काळे तलाठी यांनी पंचनामा केला आहे.
कोट....
झोपडीत राहणार्या प्रत्येक कुटुंबाने आगीपासून आपल्या संसाराची जपणूक कशी होईल यासाठी काळजी घेतली पाहिजे. येवला तालुक्यामध्ये झोपडीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्यासाठी येवला पंचायत समितीकडून पावले उचलली गेली आहे. एका वर्षांमध्ये जवळपास अडीच हजार घरकुले लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम येवला पंचायत समिती कडून होत आहे.
- प्रवीण गायकवाड, सभापती, पंचायत समिती, येवला
फोटो- ०६ खरवंडी
खरवंडी येथे आगीत भस्मसात झालेली झोपडी.
===Photopath===
060321\06nsk_49_06032021_13.jpg
===Caption===
फोटो- ०६ खरवंडी खरवंडी येथे आगीत भस्मसात झालेली झोपडी.