खानगाव थडी ते करंजीरस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 03:51 PM2018-11-19T15:51:45+5:302018-11-19T15:52:38+5:30

निफाड : खानगाव थडी ते करंजी रोडवरील या दरम्यान रस्त्यांना पडलेल्या मोठमोठ्या खड्डयामुळे व खोदलेल्या नाल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे मुश्किल झाले असून सदरचे खड्डे व नाल्या तातडीने दुरु स्त करण्याची मागणी गोदकाठच्या नागरिकांनी केली आहे

 Khatha on Kanggaon Thadi to Karanjerstha | खानगाव थडी ते करंजीरस्त्यावर खड्डे

खानगाव ते करंजी रोडला पडलेले मोठमोठे खड्डे व रस्त्याच्या कडेला वाढलेल्या दाट बाभळी  

Next
ठळक मुद्देखानगावं ते करंजी या १० ते १२ किमी अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांना वाहने चालवणे मुश्किल झाले आहे. या रस्त्याचे वैशिष्ट्य म्हणजे या रस्त्यावर नाल्या खोदल्यामुळे या नाल्यातून वाहने जाताना वाहधारकांची हाडे खिळखिळी होऊन जातात.तर वाहनांचे नु

निफाड : खानगाव थडी ते करंजी रोडवरील या दरम्यान रस्त्यांना पडलेल्या मोठमोठ्या खड्डयामुळे व खोदलेल्या नाल्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे मुश्किल झाले असून सदरचे खड्डे व नाल्या तातडीने दुरु स्त करण्याची मागणी गोदकाठच्या नागरिकांनी केली आहे
  तारु खेडले ते खानगाव थडी या दरम्यान २० ते २५ ठिकाणी नाल्या पडल्या आहेत त्यामुळे हा खड्यांचा रोड तर आहेच तसेच हा नाल्यांचा रोड आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे म्हणजे करंजी ते खानगाव थडी या दरम्यान वाहनधारकांना ९० ते ९५ नाल्या पार करून हा जीवघेणा प्रवास करावा लागतो या नाल्यामध्ये व खड्यामध्ये वाहने आदळल्याने वाहने बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे शिवाय या खड्यात वाहने आदळून जीवितहानी होण्याचा धोका वाढला आहे या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने चालवणे अवघड झाले आहे मोठे खड्डे वाचवतांना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे या गावांमधून जर रु ग्णाला उपचारासाठी तातडीने निफाड किंवा नाशिकला रु ग्णालयात न्यायचे असेल कसे न्यायचे असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहे या खराब रस्त्याला गोदकाठचचे नागरिक वैतागले आहेत
एक तर या १० किमीच्या पट्ट्यात बिबट्याचे वास्तव आहे मागील आठवड्यात करंजी ब्राम्हणवडे रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हल्ल्यात मोटारसायकलवरील वाहनधारक जखमी झाले होते. खानगाव ते करंजी या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा दाट बाभळी वाढलेल्या आहेत या रस्त्याच्या कडेला काही भागात तर मानवी वस्ती आढळून येत नाही यात मोठ्या खड्ड्यामुळे व खोल नाल्यामुळे वाहने हळू चालवावी लागतात अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी बिबट्याने हल्ला केल्यास गंभीर घटना घडू शकते सदरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे व नाल्या तातडीने बुजवण्याची मागणी जनतेने केली आहे

 

Web Title:  Khatha on Kanggaon Thadi to Karanjerstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.