खेड गणात चुरशीच्या लढती
By admin | Published: February 12, 2017 12:07 AM2017-02-12T00:07:16+5:302017-02-12T00:07:26+5:30
खेड गणात चुरशीच्या लढती
लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत खेड गणात अत्यंत चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. खेड गण अनुसूचित जमाती स्त्री राखीव झाल्याने या गणात महिला राज अवतरणार आहे. या गणात भाजपा, राष्ट्रवादी, शेकाप, शिवसेना यांच्यात लढत होणार आहे.
खेड गणात सुमारे १५५५१ एवढी मतदानसंख्या असून, वासाळी, इंदोरे, खडखेद, परदेशवाडी, खेड, अधरवड, पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव तऱ्हाळे, टाकेद खुर्द, अडसरे खुर्द या गावांचा समावेश आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील खेड गण सिन्नर विधानसभा मतदारसंघात
येत असल्याने तालुक्यातील नेत्यांबरोबरच सिन्नरच्या आजी-माजी नेत्यांच्या नजरा या गटाकडे वळल्या आहेत.
निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले तसे या गणात इच्छुक उमेदवारांनी जनसंपर्क, गाठीभेटी घेऊन मोर्चेबांधणीला सुरु वात केली होती. आतापासूनच मतदारास आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना आखल्या जात आहेत, तर निवडणुकीत नात्या-गोत्याच्या मतदानाला महत्त्व प्राप्त होणार असल्याने उमेदवारांनी गणातील आपापल्या पाहुण्यांचा शोध घेणे सुरू केले आहे.
खेड गण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गणातून सिंधूताई वाजे २०८५ मतांनी अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांना उपसभापतिपदाची संधी मिळाली होती.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पांडुरंग वारुंगसे निवडून आल्यानंतर त्यांनी सव्वा दोन वर्षे उपसभापतिपद भूषिवले. हा गण पंचायत समिती सभापतिपदाचा दावेदार आहे. कारण हा गण सभापतिपदासाठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे, आमदार राजाभाऊ वाजे यांचा प्रभाव या
गणावर राहिला आहे. गणातील सर्वच पक्षांची उमेदवारी निश्चित झाल्याने उमेदवारांच्या गृहभेटींना प्रारंभ झाला
आहे.