खेड-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी खुला
By admin | Published: February 12, 2017 12:19 AM2017-02-12T00:19:00+5:302017-02-12T00:19:11+5:30
खेड-सिन्नर महामार्ग वाहतुकीसाठी खुला
नाशिक : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नाशिक-पुणे महामार्ग दरम्यानचा खेड-सिन्नर हा १३७ किलोमीटर लांबीचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला केला असून, यामुळे नााशिक-पुणे प्रवास द्रुतगतीने होण्यास मदत झाली आहे. या प्रकल्पासाठी हिवरगावपावसा आणि चालकवाडी या दोन ठिकाणी सोमवार, दि. १२ फेब्रुवारीपासून पथकर वसुली करण्यास मंजुरी दिली आहे.
खेड-सिन्नर या १३७ किमी लांबीच्या चौपदरीकणाचे काम आयएल अॅँड एफएस या कंपनीला डीबीएफओटी या तत्त्वावर मिळाले होते. गेल्या अडीच वर्षांपासून कंपनीने १३७ पैकी १०४ किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. पुणे जिल्ह्णातील काही ठिकाणी भूसंपादनास अडथळे निर्माण झाल्यामुळे सुमारे ३० किलोमीटर बाह्ण वळण रस्त्याचे काम प्रलंबितआहे.
७६ टक्के काम पूर्ण झाल्यामुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पथकर वसुली करण्यास मंजुरी दिली आहे. पूर्ण झालेल्या रस्त्यामध्ये ६७ किलोमीटर नवीन रस्ता, ८ बाह्ण वळण रस्ते, पाच घाट दुरुस्ती, नऊ मोठे व २३ लहान पुलांचा समावेश आहे.
८ ग्रेड सेपरेटर, वाहने ये-जा करण्यासाठी ३२ ठिकाणी अंडरपास पूल, ट्रक पार्किंग तसेच अनेक ठिकाणी पथदिव्यांची सोय करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)