खेडगाव फेस्टिव्हल उत्साहात
By admin | Published: February 23, 2016 10:32 PM2016-02-23T22:32:33+5:302016-02-23T22:53:09+5:30
खेडगाव फेस्टिव्हल उत्साहात
वरखेडा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने व्यासपीठ उपलब्ध करून देत कलागुणांना वाव देणारा उपक्र म म्हणजे खेडगाव फेस्टिव्हल, असे मत महाराष्ट्राची धावपटू मोनिका आथरेने व्यक्त केले.
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने दत्तात्रय पाटील कला व क्रीडा बहुद्देशीय संस्था आयोजित खेडगाव फेस्टिव्हल उद्घाटनप्रसंगी धावपटू मोनिका आथरे बोलत होती. मंडळाचे अध्यक्ष अनिल ठुबे व त्यांचे सर्व सहकारी सदस्यांचे आभार मानून ती म्हणाली की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व स्वत:चे करिअर घडविण्यासाठी फेस्टिव्हलच्या माध्यमातून मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. यशाचा उलगडा करताना सांगितले की, आई-वडील व भाऊ यांच्या प्रेरणेने व प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनामुळे व अथक प्रयत्नांमुळे यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मत व्यक्त केले.
मंडळाच्या वतीने मोनिका आथरे व आई-वडील, भाऊ यांचा तसेच कसबे सुकेणेची नवीन धावपटू काठे हिचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार नरहरी झिरवाळ यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले. महाराष्ट्र राज्य साखर संघाचे उपाध्यक्ष श्रीराम शेटे व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांनी कार्याचा गौरव केला. याप्रसंगी निफाड येथे विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शेखर गोरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र वाघ यांची ग्रामसेवकपदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक एम. पी. पवार यांचा सत्कार करण्यात आला.
जि. प. शाळा, मविप्र संचलित आदर्श शिशुविहार, अभिनव बालविकास मंदिर, सी. एस. विद्यालय, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये समूहगीत, नृत्य, गीतगायन, नाटिका सादर केल्या. कार्यक्रमासाठी रा. काँ. तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, वसंतराव वाघ, सुनील पाटील, मधुकर आथरे, कलाबाई डोखळे, श्याम हिरे, डॉ. सातपुते, तुषार वाघ, शांताराम बारहाते आदिंसह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनिल ठुबे, महंमद सय्यद, अतुल पाटील, सुनील शेटे, महेश ठुबे, प्रीतम बाविस्कर, दीपक तिडके, प्रवीण सोनवणे, चेतन शेटे, सोमनाथ ढोकरे, गौरव पाटील, तुषार दवंगे, बंटी सोनवणे, अक्षय पाटील, संदीप पवार, संदीप बारहाते, भिकाजी उगले, पोपट महाले, प्रवीण बाविस्कर, जगन सोनवणे, माउली डोखळे, निवृत्ती डोखळे, शाळेचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जी. ए. जाधव, परदेशी, पवार, वाघ, भाऊसाहेब अहेर यांनी केले. (वार्ताहर)