खेडगावचा फळबाग लागवड परिसर लवकरच ग्रामीण पर्यटन म्हणून सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 03:49 PM2020-10-14T15:49:41+5:302020-10-14T15:52:54+5:30
खेडगाव : येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडीत जमिनीत २०१२ साली त्यावेळची मनरेगा व आताची नरेगा या योजने व ग्रामनिधी अंतर्गत खेडगाव ग्रामपालिकेने एकूण २०००० फळझाडांची लागवड केली होती. त्याला सक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे.
खेडगाव : येथील तिसगाव धरण परिसरातील खेडगाव ग्रामपालिकेच्या पडीत जमिनीत २०१२ साली त्यावेळची मनरेगा व आताची नरेगा या योजने व ग्रामनिधी अंतर्गत खेडगाव ग्रामपालिकेने एकूण २०००० फळझाडांची लागवड केली होती. त्याला सक्ष्म सिंचनाद्वारे पाणी देण्याची सोय केली आहे.
मागील आठ दिवसांपूर्वी नाशिकजिल्हा परिषदचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी नरेगाची काम पाहणी करुन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना प्रकल्पाची माहिती दिली. तसेच मंगळवारी (दि. १३) खेडगाव येथील फळबाग लागवड प्रकल्पाला भेट दिली. वणी पिंपळगाव रस्त्यालगत असलेला हा प्रकल्प बनसोड यांनी पूर्ण ३५ एकर प्रकल्प स्वत: पायी जाऊन माहिती घेतली. जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीकडे पडीत जमीन असतील अश्या पंचायतीचे सदस्य व ग्रामसेवक यांचा पाहणी दौरा आयोजित करून त्यांना पूर्ण प्रकल्प कसा उभा राहिला याचे मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच शीतल धुळे, जेष्ठ सदस्य अनिल ठुबे व ग्रामविकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकल्पाची उभारणी पासून तर आता पर्यंतची माहिती दिली. नरेगा व ग्रामनिधीच्या माध्यमातून येथे एकूण २०००० फळझाडे लावण्यात आली असून त्यापैकी आंबा, पेरू, चिकू या फळझाडांना बहार येण्यास मागील तीन ते चार वर्षांपासून सुरवात झाली असून ह्या तीनही फळझाडांचा पुढील पाच वर्षांसाठी एक खासगी व्यापाऱ्यास संभाळणी कामकाज व विक्र ी व्यवस्थापनचे लिलाव पद्धतीने दिले आहे. आता नवीन फणस बोर नारळ ह्या फळझाडानाही लवकरच फळधारणा सुरू होईल त्यातून परत ग्रामपंचायतीला उत्पन्न वाढणार आहे.
एरवी ग्रामपंचायतच्या जागेवर होणारे अतिक्र मण टाळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक शेखर गोºहे व सर्व सरपंच व सदस्य यांनी संकल्पना उदयास आली आणि आज ग्रामपंचायतला वार्षिक सध्या पाचलाख रु पये उत्पन्न सुरू झाले. या प्रकल्पालगत असलेली जलस्वराज प्रकल्पाची पाहणी सर्व अधिकारी वर्गाने केली.