मालेगावी शिक्षक समितीला खिंडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:00+5:302020-12-15T04:31:00+5:30
मालेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेत जिल्ह्यातील शंभरावर शिक्षकांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. ...
मालेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेत जिल्ह्यातील शंभरावर शिक्षकांनी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. राजेंद्र दिघे यांची विभागीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आमदार पाटील यांच्या हस्ते राजेंद्र दिघे यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
शिक्षक समितीला सोडचिठ्ठी देऊन दिघे यांच्या समवेत अनेक शिक्षकांनी शिक्षक भारतीमध्ये प्रवेश केला. यावेळी राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य सरचिटणीस भरत शेलार, राज्य उपाध्यक्ष किशोर कदम, माध्यमिकचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र लोंढे, जिल्हाध्यक्ष प्रकल्प पाटील, कार्याध्यक्ष कैलास पगार, निलेश पाटील, दीपक पाटील, वाल्मिक घरटे, कांतीलाल जाधव, चंद्रशेखर शेलार यांच्यासह तालुकाध्यक्ष सुनील ठाकरे, नवनाथ गिते, शिवाजी काझीकर, परशराम शेळके, संदीप यमगर, संतोष चोळके, प्रशांत कुलकर्णी, अनिल शेलार, अशोक शेवाळे, रमेश चव्हाण, संजय करंकाळ, विष्णू गुमाडे, अभिजीित देसले, रतिलाल निकुंभ, बाळू देवरे, महेंद्र सावळे, तात्या शेवाळे, संजय चव्हाण, रत्नप्रभा बोरसे, मनीषा सावळे, सुनीता जाधव, सुनीता धाडीवाल, नीलिमा देसले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. कैलास पगार यांनी प्रास्ताविक केले. वाल्मिक घरटे यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळी
नगर : शिक्षक भारती संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र राजेंद्र दिघे यांना देताना आमदार कपिल पाटील. समवेत राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्य सरचिटणीस भरत शेलार,राजेंद्र लोंढे, प्रकल्प पाटील आदी.