खो-खो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 06:26 PM2019-08-20T18:26:05+5:302019-08-20T18:26:25+5:30
नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक : नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्'ाचा प्राथमिक संघ निवडण्यात येणार आहे. १० आॅक्टोबर २००५ नंतर जन्माला आलेल्या खेळाडूंना अर्थात १४ वर्षांच्या खेळाडूंनाच या स्पर्धेत प्रवेश दिला जाणार आहे. सर्व सामने हे प्रथम साखळी व नंतर बाद फेरीने खेळवण्यात येणार आहेत. जे खेळाडू या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणार आहेत अशा सर्व खेळाडूंनी त्यांच्या जन्माचा मूळ दाखला व त्याची सत्य प्रत आणणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. किशोर-किशोरी गटात कमीत कमी पाच संघ उपस्थित असल्यास स्पर्धेतून संघ निवडला जाईल अथवा निवड चाचणीद्वारे प्राथमिक संघाची निवड करण्यात येईल. सहभागी होणाºया प्रत्येक संघास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २२ आॅगस्ट असून, जिल्हा खो-खो संघटनेस संलग्न असलेल्या संस्थांना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक आहे. अधिकाधिक संघांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले, सरचिटणीस मंदार देशमुख यांनी केले आहे. स्पर्धेच्या प्रवेशासाठी दत्तात्रय गुंजाळ, उमेश आटवणे, कांतीलाल महाले, रवींद्र नाकील, मोतीराम भोये, ज्ञानेश्वर लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.