खो-खो : जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा
By admin | Published: October 29, 2015 10:07 PM2015-10-29T22:07:34+5:302015-10-29T22:10:17+5:30
केबीएच, आरबीएच अजिंक्य
मालेगाव : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक व आदिनाथ इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा शालेय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात केबीएच विद्यालय, तर मुलींच्या गटात आरबीएच विद्यालयाने अजिंक्यपद पटकावले.
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ क्रीडाशिक्षक भानुदास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. गौरव कापडिया, जिल्हा क्रीडाप्रमुख प्रा. मोहन आहिरे, उपजिल्हा क्रीडाप्रमुख जाहीद हुसेन, मुख्याध्यापक अनिता शाह, खालीद अन्सारी, अब्दुल अजीज, संदीप कोंडूरकर, दिलीप पाटील आदि उपस्थित होते.
लढतीत केबीएच विद्यालयाने स्वेस हायस्कूलचा ११-९ असा अवघ्या २ गुणांने पराभव केला. मुलींच्या गटात आरबीएच विद्यालयाने काकाणी विद्यालयाचा १३-११ असा पराभव करीत अजिंक्यपद पटकावले. विजयी संघाला सोनेरी करंडक देऊन गौरविण्यात आले. विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेसाठी जाहीद हुसेन, निरीक्षक प्रा. मोहन आहिरे, पंच गुणलेखन ए. एम. गोविंद, अब्दुल सत्तार, अब्दुल अजीज, टी. पी. निकम, आर. एन. देसले, शाहीद अक्तर, दानीश शेख यांनी तांत्रिक बाबी सांभाळल्या. सूत्रसंचालन भिकू खैरनार यांनी
केले. प्रकाश सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)