"खो-खो"ची लवकरच अंतरराष्ट्रीय स्तरावर मजल : शरद पवार

By admin | Published: May 28, 2017 09:42 PM2017-05-28T21:42:53+5:302017-05-28T21:42:53+5:30

सबज्युनियर खो-खो स्पर्धांचा समारोप

"Kho-Kho" will soon be held internationally: Sharad Pawar | "खो-खो"ची लवकरच अंतरराष्ट्रीय स्तरावर मजल : शरद पवार

"खो-खो"ची लवकरच अंतरराष्ट्रीय स्तरावर मजल : शरद पवार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काही वर्षापूर्वी खो-खो खेळ महाराष्ट्र, गुजरात व इतर काही राज्यांपुरताच मर्यादित असल्याने इतर राज्यांमध्ये या खेळाविषयी फारशी जनजागृती नव्हती. त्यामुळेच या खेळाला संपूर्ण देशभरात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करून खो-खोचे राष्ट्रीय संघटन तयार करून खो-खो ला देशभरातील सर्व राज्यांमध्ये पोहोचविण्यात यश आले आहे. आता या खेळाला अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविणे गरजेचे असून आशिया खंडात खो-खो स्पर्धा होण्यासाठी प्रयत्न सुरू असून खो-खोला खेळ लवकरच अंतरराष्ट्रीय स्तरावरही लोकप्रियता प्राप्त होईल, असा विश्वास राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

 


नाशिक जिल्हा खो-खो संघटना आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या २८ व्या राष्ट्रीय सबज्युनियर खो-खो स्पर्धेचे बिक्षस वितरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय खो-खो संघटनेचे सचिव सुरेश शर्मा, वनाधिपती विनायकदादा पाटील, आमदार जयंत जाधव, महाराष्ट्र खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, राष्ट्रवादी काँंग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदि उपस्थित होते. पवार म्हणाले, नाशिकमध्ये १४ वर्षाखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलयाने येथील खेळांडूना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे. अशा स्पर्धांमधूनच भविष्यात उत्कृष्ठ खेळाडू घडतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: "Kho-Kho" will soon be held internationally: Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.