खोरीपाडा : डोंगरमाथ्यावर दोन्ही प्रजातींचे वास्तव्य, ‘रेस्तरां’चा प्रयोग यशस्वी आदिवासींच्या संवर्धनातून गिधाडांची संख्या तीनशेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:25 AM2017-09-03T01:25:22+5:302017-09-03T01:25:44+5:30

अन्नसाखळीमधील महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे गिधाड हा नामशेष होत असल्याने जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे;

Khoripada: The existence of both species on the hilltop, the use of the 'restaurant' has successfully succeeded the tribal population in the number of vultures | खोरीपाडा : डोंगरमाथ्यावर दोन्ही प्रजातींचे वास्तव्य, ‘रेस्तरां’चा प्रयोग यशस्वी आदिवासींच्या संवर्धनातून गिधाडांची संख्या तीनशेवर

खोरीपाडा : डोंगरमाथ्यावर दोन्ही प्रजातींचे वास्तव्य, ‘रेस्तरां’चा प्रयोग यशस्वी आदिवासींच्या संवर्धनातून गिधाडांची संख्या तीनशेवर

Next

नाशिक : अन्नसाखळीमधील महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे गिधाड हा नामशेष होत असल्याने जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे; मात्र नाशिक जिल्ह्यातील खोरीपाडा येथील डोंगरमाथ्यावर आदिवासी बांधवांच्या प्रयत्नांमुळे दोन्ही प्रजातीच्या शेकडो गिधाडे वास्तव्यास असून, हे शुभवर्तमान आहे.
गिधाड हा निसर्गाचा ‘सफाई कामगार’ म्हणून ओळखला जातो. गिधाडच्या प्रजाती जागतिक स्तरावर आणि भारतातही धोक्यात आल्या; मात्र त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खोरीपाडा येथे आदिवासी मागील सहा वर्षांपासून गिधाड संवर्धनासाठी झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले असून, दोन्ही प्रजातींच्या गिधाडांच्या संख्येत शेकडोने वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र ‘गिधाड रेस्तरां’च्या परिसरात दिसते.
गिधाड संवर्धन ही काळाची गरज ओळखून तसेच खोरीपाड्याभोवती असलेला डोंगरमाथा व बहरलेल्या वृक्षसंपदा लक्षात घेत वनविभागाने येथील रहिवाशांची चर्चा के ली. २०११ साली तत्काळ संयुक्त वनव्यवस्थापन समिती गठीत केली. गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी वनविभागाच्या तत्कालीन अधिकाºयांनी जागेची पाहणी करून संरक्षक कुंपण तयार केले. त्या जागेला नाव दिले ‘गिधाड रेस्तरां’. या पथदर्शी प्रक्रल्पाने सहा वर्षांमध्ये मोठे यश गाठले आहे. या भागात अवघे बोटावर मोजण्याइतके गिधाडे कधी तरी हजेरी लावत असे; मात्र सध्या ही संख्या तीनशेवर जाऊन पोहचली आहे. रेस्तरांमध्ये मृत जनावरांची तपासणी करून टाकले जाते. सरकारी खात्याची इच्छाशक्ती आणि त्यानुसार केलेल्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली, तर निसर्गाचे संवर्धन कशा पद्धतीने होऊ शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण खोरीपाड्यात पहावयास मिळते. खोरीपाड्यात लांब चोचीचे व पांढºया पाठीच्या अशा गिधाडांच्या दोन प्रजाती आढळून येतात.

Web Title: Khoripada: The existence of both species on the hilltop, the use of the 'restaurant' has successfully succeeded the tribal population in the number of vultures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.