खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 09:14 PM2021-01-17T21:14:35+5:302021-01-19T01:36:39+5:30

कळवण : गावखेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे. खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार जाऊ लागल्याने जाधवांच्या या ह्यविजयह्णचे कौतुक होत असून त्यांच्या या कलेची दखल घेत त्यांना नवउद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Khuntewadi's bullock cart across the sea | खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार

खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार

googlenewsNext
ठळक मुद्देकोरीव कामाची दखल : नवउद्योजक पुरस्काराने गौरव

कळवण : गावखेड्यातून नामशेष होत असलेल्या बैलगाडीचे आकर्षण आजही कायम असल्याने आता तिची प्रतिकृती शोपीस म्हणून घरे, कार्यालय व इतर अनेक ठिकाणी दिसू लागली आहे. यांतील बहुतांश कलात्मक बैलगाड्या देवळा तालुक्यातील खुंटेवाडी येथील विजय जाधव यांनी बनवल्या आहेत. त्यांच्या या कलाकृतीला परदेशातून मागणी होऊ लागली आहे. खुंटेवाडीची बैलगाडी सातासमुद्रापार जाऊ लागल्याने जाधवांच्या या ह्यविजयह्णचे कौतुक होत असून त्यांच्या या कलेची दखल घेत त्यांना नवउद्योजक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या जगण्याचा कधीकाळी बैल हा एकमेव आधार होता आणि बैलगाडी हेच साधन प्रत्येक कामासाठी वापरले जात असे. परंतु कालानुरूप बैल व गाडी मागे पडत गेले असले तरी त्यांच्या सोबतच्या आठवणी मात्र प्रत्येकाच्या मनात कायम आहेत. यामुळेच या बैलगाडींना देशांतर्गत तर मागणी आहेच; पण आता परदेशातूनही मागणी होऊ लागल्याने ती ग्लोबल झाली आहे.

बैलगाडी पाठवल्या असून मलेशिया व इतर काही देशांतून बैलगाडी पाठवा असे संदेश जाधव यांना येत आहेत. ओमान, झांबिया या देशांसह बेळगाव, गुलबर्गा (कर्नाटक), तामिळनाडू, केरळ, पंजाब, छत्तीसगड यांच्यासह पुणे, मुंबई, रत्नागिरी, बुलडाणा, औरंगाबाद, सातारा, नाशिक आदी ठिकाणी या बैलगाड्या पोहचल्या आहेत. या कामात त्यांना पत्नी वंदना, मुलगा प्रणव यांचे सहकार्य लाभत आहे.

सागवानी लाकूड, उत्कृष्ट दर्जाचे एमडीएफ प्लाय, फायबरचे बैल व शेतकरी कुटुंब, पितळेची चाकांची धाव व घुंगरू यातून ही बैलगाडी साकारली आहे. सूक्ष्म कोरीवकाम, रंगरंगोटी, आखीव-रेखीव, प्रमाणबद्ध व कुंदन नक्षीकाम असलेल्या लहान-मोठ्या तीन-चार आकारात या बैलगाड्या बनविल्या आहेत.

खुंटेवाडीची बैलगाडी परदेशात जाऊ लागल्याने आमच्या गावाची ओळख वाढू लागली आहे. विजय जाधव यांच्या कलाकारीचा आम्हाला अभिमान आहे.

- भाऊसाहेब पगार,उपसरपंच, खुंटेवाडी

Web Title: Khuntewadi's bullock cart across the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.