मालेगाव कॅम्पातील स्मशानभूमीची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 11:18 PM2021-10-12T23:18:29+5:302021-10-12T23:23:30+5:30
मालेगाव : कॅम्पातील शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संबंधितांनी स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी नगरसेवक भिमा भडांगे यांनी निवेदनाद्वारे मनपा आयुक्तांकडे केली आहे.

शिवाजीनगर भागातील स्मशानभूमीच्या छत पूर्णपणे फाटलेले आहे. शव ठेवण्याच्या जागेवर गज वरती आले आहेत. या भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे नियुक्त केलेला कर्मचारी नेहमी गैरहजर असतो. याबाबतच्या तक्रारी २३ सप्टेंबर रोजी आयुक्तांकडे करूनही दखल घेण्यात आलेली नाही. मृतदेहास अग्नीडाग दिला जातो त्यावेळी पावसाळ्यात छतातून पावसाचे पाणी मृतदेहावर पडते. स्मशानभूमीचे लोखंडी प्रवेशद्वार तुटले असून मोकाट जनावरे फिरत असतात. स्मशानभूमीवर नियुक्त कर्मचारी जागेवर रहात नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना मृत्यूचे दाखले मिळविणे कामी अडचणी निर्माण होतात. मनपाकडून स्मशानभूमीसाठी दिलेला निधी कुठे वापरला जातो याची माहिती मिळत नाही.