सुरगाण्यातील अपहृत आदिवासी मुलीची पंजाबमधून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:48+5:302021-05-22T04:14:48+5:30
सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील सोनाली गावित या आदिवासी मुलीचे ४ एप्रिल रोजी अपहरण झाले होते. त्या ट्रकमध्ये ...
सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथील सोनाली गावित या आदिवासी मुलीचे ४ एप्रिल रोजी अपहरण झाले होते. त्या ट्रकमध्ये आणखी १५ मुलांचे देखील अपहरण करण्यात आलेले होते. पण ती मुले कुठली होती हे त्या मुलीस समजले नाही. त्यांना एका ट्रकने पंजाब प्रांतात नेण्यात आले. हा ट्रक अमृतसर भागात एका ठिकाणी थांबला असतांना सोनालीने ट्रकमधून उडी मारून पलायन केले. त्यानंतर तिची भेट एका महिलेशी झाली. त्या महिलेले सोनालीच्या पालकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. सोनालीची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी शिवसेनेचे सुरगाणा तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे यांना सर्व हकीगत कथन केली. गांगुर्डे यांनी कळवण विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख केशरीनाथ पाटील यांच्याशी संपर्क करून मदतीचे आवाहन केले. पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, आमदार सुनील राऊत यांना माहिती देत पंजाबकडे प्रस्थान केले. अमृतसर येथील शिवसेनेचे पदाधिकारी यांचेशीही भ्रमणध्वनी वरून संपर्क करून मदत करण्यासाठी सांगितले. अखेर सोनालीपर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झाले आणि सोनाली सुखरुप घरी परतली.