अपहृत युवकाला जखमी अवस्थेत बेवारस सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 01:10 AM2019-08-27T01:10:39+5:302019-08-27T01:11:13+5:30
दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाचे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख रुपयांसाठी अपहरण करून मारहाण केलेल्या अवस्थेत जळगाव मार्गावर घाटात बेवारसपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२६) उघडकीस आला आहे.
पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय युवकाचे आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लाख रुपयांसाठी अपहरण करून मारहाण केलेल्या अवस्थेत जळगाव मार्गावर घाटात बेवारसपणे फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि.२६) उघडकीस आला आहे. याप्रकरणी आठ संशयितांवर अपहरण, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ जळगावनिवासी असलेले सध्या तारवालानगरमध्ये राहणारे बबन पंढरीनाथ महाजन यांनी धुळे मोहाडीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन गुन्हा आडगाव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते मोलमजुरी करत असून, (दि.२३) दुपारी संशयित आरोपी मयूर वसंत सोनवणे, रवी, राहुल, एकनाथ व त्यांचे अन्य तीन साथीदारांसह आदींनी (नाव पत्ता माहीत नाही) महाजन याला एका टाटा सफारी कारमध्ये (एम.एच१९ सीडी७९९९) बळजबरीने बसवून जळगावला घेऊन गेले. रस्त्यात त्यांना जबर मारहाण करत दोन लाख रु पयांची मागणी केली.
व महाजन याच्याजवळ असलेले दोन एटीएम व मोबाइल काढून घेत घाटात सोडून दिले. काही नागरिकांनी जखमी महाजनला रु ग्णालयात दाखल केले त्यानंतर त्यांनी दिलेल्या जबाबवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हा गुन्हा आडगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. या गुन्ह्यातील आठ संशयितांविरुद्ध खंडणीसाठी अपहरण केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये संशयित सोनवणे याने उपनिरीक्षक दीपक गिरमे यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत गिरमे यांची निलंबन करण्यात आले होते.