अपहरणाचा बनाव; तरुणाविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 01:53 AM2018-07-07T01:53:56+5:302018-07-07T01:54:01+5:30
मालेगाव : नातेवाइकांना स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विशाल नाना जाधव (२४) या तरुणावर छावणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

विशाल जाधव (रा. मोहन चित्रपटगृहाच्या पाठीमागे) याच्यावर दीड लाख रुपयांचे नातेवाइकांचे कर्ज आहे. ४ जुलै रोजी घरातून बाहेर पडून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास माझे अपहरण झाल्याचे बहिणीला व्हॉट्सअॅपवर मॅसेज केला. त्याच्या घरच्यांनी छावणी पोलीस ठाण्यात तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे गतिमान केली. मोबाइल लोकेशन व इतर तपास यंत्रणांद्वारे विशाल हा नगर येथे असल्याचे तपासात उघड झाले. छावणी पोलिसांनी नगर गाठून शिताफीने विशाल याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याला खाक्या दाखविल्यानंतर त्याने अपहरण झाल्याचा खोटा बनाव केल्याचे कबूल केले. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.