सटाण्यात तरुणाचे अपहरण नाट्य,दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 02:02 PM2020-10-09T14:02:20+5:302020-10-09T14:34:29+5:30
सटाणा : येथील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोधेश्वर नाक्यावरील चायनीजचा गाडा लावणा?र्या युवकास चौघांनी स्वत:ला पोलिस असल्याचे भासवून धाक दाखवत बळजबरीने गाडीत बसवले आणि चार लाख रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी भरदुपारी अपहरण करून सोडून दिल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. भरदिवसा घडलेल्या या अपहरण नाट्यामुळे सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु आहे. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे, तर दोन संशयित युवक अद्यापही फरार आहेत.

याबाबत फिर्यादी सनी धनंजय आहिरे (२८, रा.मुळाणे, ता.बागलाण) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस ठाण्यापासून जवळ असलेल्या शहरातील दोधेश्वर नाक्यावर तो चायनीज हातगाड्याचा व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. मंगळवारी दुपारी दोन वाजता नेहमीप्रमाणे त्याने गाडा लावला. पावणे तीन वाजता एक पांढऱ्या रंगाचे तवेरा (क्रमांक माहीत नाही) चारचाकी वाहन त्याच्या दुकानाजवळ आले आणि वाहनातील विकी गुर्जर (२९) याने सनीची कॉलर पकडून बळजबरीने वाहनात बसविले. यावेळी वाहनाचा चालक असलेल्या जयेश जाधव (२७) यालाही त्याने ओळखले. यानंतर त्यांनी सनीला मालेगाव रस्त्यामार्गे आघार रावळगाव फाटा येथे नेले. तेथे त्यांचे आणखी दोन मित्रही वाहनात बसले. संवादावरुन एकाचे नाव पोलार्ड तर दुस?र्याचे नाव जाधव (दोघांचे वय माहीत नाही) असल्याचे समजले. त्यापैकी जाधव याने पोलिस आहे, तुज़्या घरी फोन लावह्ण असे धमकावून सांगितले. त्यानुसार सनीने आईला फोन लावल्यावर घाबरलेल्या आईने, आमच्याकडे इतके पैसे नाहीत, मी पैसे कोठून आणूह्ण असे सांगताच त्यांनी फोन कट केला आणि पोलाडर्ने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
तेथून त्यांनी सातमाने, रावळगाव, लखमापूरमार्गे घेऊन येताना सनीला मारहाण करून दमही दिला. यावेळी त्यांनी ह्यतुला दोन लाख रुपये तरी द्यावेच लागतील असे सांगून लगेच पैसे देण्यास घरच्यांना सांग असा दम दिला. त्यामुळे घाबरलेल्या आईला फोन करून माज़्या बँक खात्यावर तत्काळ वीस हजार रुपये टाकण्यास सांगितले. यानंतर शहरातील मालेगाव रस्त्यावरील स्टेट बँकेच्या एटीएममधून वीस हजार रुपये काढून जयेश जाधव याला दिले. रात्री साडेआठ वाजता त्यांनी सनीला भाक्षी रस्त्यावरील मंजुळे पेट्रोलपंपाच्या मागे सोडले आणि उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत उर्वरित पैसे आणून दे, नाहीतर तुला बघून घेऊ.ह्ण असा दम देऊन फरार झाले. घरी कसाबसा पोहोचल्यावर घरच्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तत्काळ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. दरम्यान, पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदशर्नाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी गुन्हा दाखल करून विकी गुर्जर व जयेश जाधव या दोघा संशयिताना अटक केली आहे. त्यांना सटाणा न्यायालयासमोर उभे केले असता दोघांना शनिवारपर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर उर्वरित दोघे संशयित फरारी असून त्यांचा शोध सुरू असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.