किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:14 PM2018-07-12T23:14:20+5:302018-07-13T00:27:57+5:30

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून २५ लाखांचा पुरस्कार पटकावला.

Kikwar Kurda 25 lakhs prize | किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस

किकवारी खुर्दला २५ लाखांचे बक्षीस

Next
ठळक मुद्देग्रामस्वच्छता अभियान आदर्श गाव आता स्मार्ट व्हिलेज

जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून २५ लाखांचा पुरस्कार पटकावला. गाव आदर्श करून एवढ्यावर न थांबता हगणदारीमुक्त करून भारत सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार गावाने पटकावला आहे. तसेच गावाने जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे करून महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियानाचा प्रथम पुरस्कार मिळविला आहे.
आमच्या गावात आमचे सरकार, पंचायतराज पुरस्कार, जलस्वराज्य प्रकल्प राबवून गावाने आदर्श जपला आहे.
आदर्श गावाचे प्रणेते केदा बापू काकुळते यांच्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने गावात सामुदायिक मंगल कार्यालय व वृक्षलागवड करून पक्ष्यांचे गाव म्हणून व गार्डन गाव म्हणून ओळखले जात आहे.
विभागातून नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांतून विभागून दोन ग्रामपंचायतींची तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून प्रत्येकी एका ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
लोकसहभागातून जलसंधारणाची कामे
स्मार्ट व्हिलेजचे परीक्षण झाल्यानंतर जिल्ह्याच्या बक्षिसाला आपण १०० टक्के पात्र असू असा आशावाद असूनही एवढ्यावर न थांबता लोकवर्गणी व लोकसहभागातून अनेक नालाबांध करून जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे केलीत व ते नालाबांध पहिल्याच पावसात भरल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान आहे. जिल्ह्याच्या स्मार्ट व्हिलेजच्या मिळणाºया बक्षिसांची रक्कम गावाच्या विकासासाठी व गावाच्या सौंदर्यात भर कशी पडेल यासाठी सूत्रबद्ध नियोजन करून गाव अधिक स्मार्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Kikwar Kurda 25 lakhs prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.