लोहोणेर येथे आगीत बैल ठार
By admin | Published: March 12, 2016 10:43 PM2016-03-12T22:43:24+5:302016-03-12T22:45:04+5:30
लोहोणेर येथे आगीत बैल ठार
लोहोणेर : खालप येथील शेतकरी यादव गंगाराम सूर्यवंशी यांच्या कांदाचाळीस दुपारी २ वाजता अचानक आग लागल्याने चाळीजवळ बांधलेला बैल भाजला गेल्याने मृत्युमुखी पडला. कांदाचाळीला आग लागल्याचे मालक यादव सूर्यवंशी यांना समजताच त्यांनी धाव घेतली. एक बैल व म्हैस सोडविली. आग इतकी भयानक होती की, दुसरा बैल सोडवत असताना सूर्यवंशी यांच्या हाताला व डोक्याला आगीची धग लागताच त्यांनी तेथून पळ काढला व ते वाचले; मात्र चाळीमध्ये असलेले शेतोपयोगी साहित्य पिस्टर्न पंप, क्रेट, लाकडी बांबू, पीव्हीसी पाइप, ठिंबक सिंचन मटेरियलसह दोन लाख पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. जनावरांना आगीचा चटका बसल्याने ते जखमी झाले आहेत. तलाठी व्ही. एस. गुंजाळ यांनी पंचनामा केला. एन.पी. सूर्यवंशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर )