महिरावणीजवळ वाहनाच्या धडकेत तरस ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 04:52 PM2020-06-07T16:52:13+5:302020-06-07T16:53:18+5:30
नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी शिवारातून रात्रीच्या सुमारास खाद्याच्या शोधात भटकंती करताना तरस वन्यप्राणी रस्ता ओलांडत होता. दरम्यान, एका ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी शिवारातून रात्रीच्या सुमारास खाद्याच्या शोधात भटकंती करताना तरस वन्यप्राणी रस्ता ओलांडत होता. दरम्यान, एका भरधाव जाणाऱ्या वाहनाने तरसाला जोरदार धडक दिली. या धडकेत जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती सकाळी नागरिकांनी वनविभागासह पोलिसांना दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत तरसाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. अंदाजे सात वर्षे वयाची तरसाची मादी होती अशी माहिती नाशिक पश्चिम वनविभागाच्या सुत्रांनी दिली.
---
मोहेगावमध्ये शेतक-यांना बिबट्याचे दर्शन
नाशिक : पुणे महामार्गावरील पळसे गावापासून जवळच असलेल्या मोहेगाव या खेड्यांमध्ये मळे भागात भरदिवसा बिबट्याने शेतकऱ्यांना दर्शन दिले. बाजरीच्या शेतात बिबट दडून बसलेला होता. दुपारच्या सुमाास काही शेतमजूर येथे कामासाठी आले असता त्यांना गुरगुण्याचा आवाज कानी पडला आणि ते वेळीच सावध झाले. शेतक-यांनी हातात लाठ्या-काठ्या घेत शेत पिंजून काढण्यास सुरूवात केली. तसेच घटनेची माहिती नाशिक पश्चिम वनविभागाला कळविली. यावेळी अवघ्या काही मिनिटांतच बिबट्याने थेट शेतातून बाहेर झेप घेत मळे भागात धूम ठोकली. घटनेची माहिती समजताच वनकर्मचाºयांनी मोहेगावात जाऊन पाहणी क रून खात्री केली. बिबट्या पळत असल्याची चित्रफितही यावेळी शेतकºयांनी वनअधिकारी व कर्मचा-यांना दाखविली.