स्कॉर्पिओ पुलावरून कोसळून एक ठार
By admin | Published: October 5, 2016 01:36 AM2016-10-05T01:36:48+5:302016-10-05T01:59:19+5:30
स्कॉर्पिओ पुलावरून कोसळून एक ठार
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवरील पिंपळगाव बहुलानजीक असलेल्या नासर्डी पुलावरून भरधाव स्कॉर्पिओ खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़१) रात्रीच्या सुमारास घडली़ धीरज लोटनराव जाधव (३२, रा़ लालबहादूर चौक, अशोकनगर, सातपूर) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास धीरज जाधव हा आपली स्कॉर्पिओ (एमएच ४१, सी ८८२६) भरधाव घेऊन येत होता़ त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने पिंपळगाव बहुला येथील नासर्डी पुलाच्या कथड्याला लावलेल्या पाईपला ठोस मारून गाडी नाल्यात पडली़ यामध्ये धीरज जाधव याला गंभीर जखमी झाल्याने त्यास अगोदर खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या अपघातात त्याच्या सोबत असलेला पंकज लक्ष्मण जाधव हा गंभीर जखमी झाला आहे़ याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)