कुल्फी खाल्याने ५५ जणांना विषबाधा
By admin | Published: March 25, 2017 04:42 PM2017-03-25T16:42:14+5:302017-03-25T16:42:29+5:30
द्याने/नामपूर: कुल्फी खाल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई ,महड ,बहिराने या गावात घडली आहे.
द्याने/नामपूर: कुल्फी खाल्याने सुमारे ५५ जणांना विषबाधा झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील काटवण भागातील चिराई ,महड ,बहिराने या गावात घडली असून सदर कुल्फी विक्र ेत्यास नामपुर पोलिसानी ताब्यात घेतले आहे. विषबाधितांवर नामपूर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.
शुक्र वार दि. २४ मार्च रोजी दुपारी अखिलेशकुमार रामप्रसाद कुमावत हा मटका कुल्फी विक्र ी करत होता .यात नेहमी प्रमाणे चिराई ,महड , बहिराने या गावातील लहान मुले, महिला, पुरु ष ,जेष्ठ नागरिक असा सर्वच वयोगटातील सुमारे ५० ते ६० जणांनी कुल्फी खाल्ली .यात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सर्वाना मळमळ ,उलटी , जुलाब ,चक्कर येण्यास सुरवात झाली.यात रात्री उशीरा खाजगी वाहनाने तात्काळ पुढील उपचारासाठी नामपुरच्या ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात आले .यात साधारणता सुमारे ५५ रु ग्णांवर वैद्यकिय अधिकारी डॉ एन.एम. भामरे ,डॉ.योगेश मोराणे,डॉ.मंडावत यांनी तातडीने उपचार सुरु केले . तात्काळ योग्य उपचार झाल्यामुळे विषबाधित
रु ग्णाची प्रकुती ठिक असून घटनेची माहीती मिळताच पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड,श्रीराम कोळी यांच्यासह नामपुर परिसरातील विविध सामाजिक ,राजकीय नेत्यांनी ग्रामीण रु ग्णालयात रु ग्णाची विचारपूस केली . चिराईचे सरपंच शंकुतला पाटिल यांनी कुल्फी विक्र ेत्यावर कारवाई करण्याची मागणी केलीआहे .नामपुर ग्रामीण रु ग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून येत्या दोन दिवसात सर्व रु ग्णाची रक्त,लघवी तपासणी करु न सुखरूप घरी पाठवण्यात येणार असल्याची माहीती रु ग्णालय प्रशासनाने दिली आहे