वक्तृत्व स्पर्धेसाठी किमया अहिरेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:58 PM2018-12-14T22:58:05+5:302018-12-15T00:21:48+5:30
सटाणा तालुक्यातील चौगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील किमया दादाजी अहिरे या विद्यार्थिनीने संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर येथे झालेल्या विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळविले.
सटाणा : तालुक्यातील चौगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या शरद पवार माध्यमिक विद्यालयातील किमया दादाजी अहिरे या विद्यार्थिनीने संस्थेच्या रयत विज्ञान परिषद या प्रकल्पाअंतर्गत अहमदनगर येथे झालेल्या विभागीय पातळीवरील वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश मिळविले. तिची २८ डिसेंबर रोजी वाशी (नवी मुंबई) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
रयत शिक्षण संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर येथे विभागीय वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ‘प्लॅस्टिकमुक्ती - स्वच्छ भारत अभियान’ या विषयावर किमया अहिरे हिने उत्कृष्ट सादरीकरण केल्याने तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
शंकर मांडवडे, सरपंच लक्ष्मण मांडवड आदींनी किमयाचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक एम. बी. सिनारे, विज्ञानशिक्षक ए. आर. मांडवडे, ए. के. कापडणीस यांच्या हस्ते किमयाचा सत्कार करण्यात आला. एस. के. कापडणीस, ए. डी. सूर्यवंशी, एस. बी. भोसले, जी. एस. पगार, पी. डी. अहिरे, व्ही. डी. कापडणीस, व्ही. डी. भामरे, पी. एन. गांगुर्डे, एस. पी. सोनवणे आदी उपस्थित होते.