जाखोरी शिवरस्त्यावर अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:57 PM2020-08-04T22:57:22+5:302020-08-05T01:15:26+5:30
एकलहरे : येथील मातोश्री महाविद्यालयाजवळून हिंगणवेढे शिवमार्गे जाखोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. हा रस्ता एकलहरे ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येतो. वारंवार मागणी करूनही या रस्त्यावरील विद्युतदिवे सुरू करण्यास टाळाटाळ केली जात आहे. येथील दिवाबत्ती त्वरित सुरू केली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

हा रस्ता एकलहरे-जाखोरी शिवरस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्याच्या दुतर्फा एकलहरे, हिंगणवेढे भागातील मळे वसाहती आहेत. मातोश्री महाविद्यालय परिसरातील रहिवासी, विद्यार्थी यांच्यासह ओढा, एकलहरे, हिंगणवेढे, कोटमगाव, जाखोरी या भागातील नागरिकांचा वावर असतो. या रस्त्याच्या सुरु वातीपासूनच येथे दिवाबत्तीची सोय केलेली नसल्याने रात्री-बेरात्री प्रवास करताना भीती वाटते. परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस, द्राक्षे, मका, टमाटे ही पिके उभी असल्याने बिबट्यांना लपण्यास जागा मिळते. रात्री-बेरात्री व दिवसाढवळ्या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने येथील रहिवासी भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. गेल्याच आठवड्यात ज्ञानेश्वर पवळे यांच्या श्वानास बिबट्याने रात्री आठच्या सुमारास फरफटत नेऊन फस्त केले. सायंकाळनंतर बाहेर फिरणे जिकरीचे झाले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खर्जुलमळा, पवळे वस्तीतील रहिवाशांनी अनेकवेळा ग्रामपंचायतीस लाइट सुरू करण्याबाबत अर्ज, विनंती, निवेदने दिली आहेत. मात्र ग्रामपंचायतीतर्फे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, येथील दिवाबत्ती कामाचा प्रस्ताव मंजूर असून, कोरोनामुळे काम सुरू करता येत नसल्याचे सरपंचांनी सांगितले.