गोदाघाट रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:14 AM2021-05-18T04:14:26+5:302021-05-18T04:14:26+5:30
मोकळे भूखंड बनले डम्पिंग ग्राउंड नाशिक : शहर परिसरात मोकळे भूखंड सध्या डम्पिंग ग्राउंड बनले आहे. ट्रॅक्टर, हातगाडी आणि ...
मोकळे भूखंड बनले डम्पिंग ग्राउंड
नाशिक : शहर परिसरात मोकळे भूखंड सध्या डम्पिंग ग्राउंड बनले आहे. ट्रॅक्टर, हातगाडी आणि छोट्या वाहनातून विटा, दगड, माती, सिमेंटचे तुकडे आणून टाकले जात आहेत. अनेकदा कापसाच्या गाद्या, थर्माकोलसारख्या वस्तू अशा ठिकाणी फेकून देतात. अशा ठिकाणी कचरा टाकू नये, असे फलक लावूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
नाशिक रोडला अंतर्गत रस्त्यावर भरतोय भाजीबाजार
नाशिक : स्टेट बॅँक चौक तसेच वास्को सर्कल, मशीद रोड या अंतर्गत रस्त्यावरील बाजारात गर्दी वाढत आहे. कोरोनाचा काळ असताना गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना भाजीबाजारात मात्र ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. नागरिकांना बाहेर पडण्यास मनाई असतानाही अंतर्गत रस्त्यांवर अनधिकृत भाजीबाजार भरत आहे.
टाकळी चौकातील वळण धोक्याचे
नाशिक : टाकळी चौकातून अवजड वाहतूक सुरू झाल्याने महामार्गाकडे मार्गस्थ होणाऱ्या अवजड वाहनांमुळे टाकळी चौक धोक्याचा बनला आहे. लहान-मोठी घरे आणि दुकाने येथे असल्याने परिसरात नेहमीच वर्दळ असते. एकाच वळणावरून दुसरेही वळण लागलीच येत असल्याने धोका अधिक वाढला आहे.
कोरोनाच्या काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा
नाशिक : कोरोनामुळे स्वच्छतेला प्राधान्य दिले जात असून, महापालिकेच्या वतीने चौकाचौकात आणि परिसरात स्वच्छता करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेच्या ठेकेदाराकडील कर्मचारी रस्त्यांवर ठिकठिकाणी स्वच्छता करताना दिसत आहेत. सोसायटी, कॉलनी परिसरापासून ते झोपडपट्टीपर्यंतच्या भागात हे कर्मचारी सेवा देत आहेत.