घोटी-सिन्नर रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:54 PM2020-08-27T16:54:15+5:302020-08-27T16:55:04+5:30

घोटी : घोटी-सिन्नर मार्ग प्रचंड रहदारीचा रस्ता असून मालवाहू गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असून सिन्नर सह भंडारदरा मार्गे नगरला जाणारी वाहतूक लक्षणीय आहे. घोटी सिन्नर रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे परंतु रस्त्याच्या आजूबाजूला फक्त माती टाकल्याने पहिल्याच पावसात प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाले असून दररोज कित्येक वाहने या चिखलात फसत असून नागरिकांसह व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

The kingdom of mud along the Ghoti-Sinnar road | घोटी-सिन्नर रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य

घोटी-सिन्नर रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य

googlenewsNext
ठळक मुद्देवाहने फसतात : नागरीक,चालक अन् उद्योजकांचे अतोनात हाल

घोटी : घोटी-सिन्नर मार्ग प्रचंड रहदारीचा रस्ता असून मालवाहू गाड्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक दररोज होत असून सिन्नर सह भंडारदरा मार्गे नगरला जाणारी वाहतूक लक्षणीय आहे. घोटी सिन्नर रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी काम झाले आहे परंतु रस्त्याच्या आजूबाजूला फक्त माती टाकल्याने पहिल्याच पावसात प्रचंड चिखलाचे साम्राज्य झाले असून दररोज कित्येक वाहने या चिखलात फसत असून नागरिकांसह व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत.
घोटी शहरापासून ३ किलो मीटरवर वरील देवळे परिसरात १५ ते २० राईस व भगर मिल, हॉटेल्स,पोल्ट्रीफार्म, वीटभट्टी अश्या विविध प्रकारचे उद्योगाचे ठिकाण असून या परिसरातील उद्योगासाठी मोठं मोठे कंटेनर येत असतात. चिखलात वाहने फसत असल्याने गत २ महिन्यापासून या उद्योजकांचे धंदे ठप्प झाले आहेत.
इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत.े पहिल्याच पावसात रस्त्याच्या बाजूला टाकलेल्या मातीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
घोटी मार्गे सिन्नर, शिर्र्डी, भंडारदरा, कळसुबाईचे शीखर येथे दररोज जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असून सिन्नर पासून घोटी पर्यंत कित्येक वाहने रस्त्याच्या खाली चिखलात फसल्या असतांनाचे निदर्शनास पडतात. घोटी सिन्नर रस्त्यावर फसलेली वाहने काढण्यासाठी आवश्यक ते साधने उपलब्ध नसल्याने बाहेरील वाहन चालकांचे बरेच हाल होत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला माती ऐवजी मुरु म, खडी टाकुन रस्त्याच्याकडेला जाणाºया रस्त्याचे मार्ग सुखकर करावेत अशी मागणी घोटी शहर परिसरातील उद्योग व्यावसायिक यांच्याकडून होत आहे. (फोटो २७ घोटी, २७ घोटी २)

Web Title: The kingdom of mud along the Ghoti-Sinnar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.