द्वारका चौकात खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 10:40 PM2020-08-08T22:40:54+5:302020-08-09T00:18:13+5:30
नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, लहान-मोठ्या अपघातांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शहरात अद्याप जोरदार पावसाला सुरुवात झालेली नसून केवल हलक्या सरींचा अधूनमधून वर्षाव होत आहे. तरीदेखील द्वारका चौकातील रस्त्यावर खड्ड्यांची चाळण पहावयास मिळू लागल्याने निकृ ष्ट दर्जाच्या डांबरीकरणाचे पितळ उघडे झाले आहे. द्वारका चौकातून उड्डाणपूल जातो. यामुळे निम्मा चौक झाकला जातो, तरीदेखील पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे. द्वारक ा चौकातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अपघात होत आहेत. तसेच पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील डांबरीकरण नाहीसे होऊन कच, खडी सर्वत्र विखुरली गेली आहे. यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. खड्डे चुकवितांना वाहनचालकांना तारेवरची कसरत करत द्वारका ओलांडावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने चांगल्यापद्धतीने द्वारका चौकात पडलेले खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.थातूरमातूर काम नको
द्वारका चौकातील खड्डे बुजवितांना महापालिका प्रशासनाने
थातूरमातूर पद्धतीने बुजवू नये, असे नागरिकांचे म्हणणे आहे. उगाचच कार्यवाहीचा फार्स दाखवू नये तर दर्जेदार पद्धतीने किमान पावसाळ्यापर्यंत तरी सहजरीत्या ‘द्वारका’ ओलांडता येईल, अशारीतीने खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’ अशी स्थिती या चौकात काही दिवसांनी पुन्हा पहावयास मिळण्याची
शक्यता नाकारता येत नाही.