मानोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:18 AM2021-02-26T04:18:56+5:302021-02-26T04:18:56+5:30
-------------------- विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषद व ...
--------------------
विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
सिन्नर : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नगरपरिषद व पोलीस प्रशासनाने दखल घेत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहेत.
--------------------
लाल कांद्याच्या दरात घसरण
सिन्नर : येथील बाजार समितीच्या दोडी येथील उपबाजारात लाल कांद्याच्या भावात ६०० रुपये घसरण झाली. बुधवारी सरासरी ३२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. तर सोमवारी नांदूरशिंगोटे उपबाजारात ३८०० रुपये भाव होता. त्यामुळे अवघ्या दोन दिवसांत ६०० रुपयांची घसरण झाली आहे.
--------------
आगसखिंड नदीपात्रात आढळला मृतदेह
सिन्नर : तालुक्यातील आगसखिंड शिवारातील दारणा नदीपात्रात २५ ते ३० वर्षीय वयाच्या अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरगंत असल्याचे बुधवारी उघडकीस आले. बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
म्हाळोबा महाराज यात्रोत्सव रद्द
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रोत्सव कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, ग्रामस्थ यांच्यात बैठक होवून धार्मिक कार्यक्रम वगळता सामुदायिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.