मुंबई-आग्रारोडवरील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 10:45 PM2020-09-08T22:45:40+5:302020-09-09T00:52:13+5:30
चांदवड : येथील सोमा टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत चांदवड येथील मुंबई - आग्रा महामार्गावरील राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३ वरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्षअनंत सूर्यवंशी यांच्या मागर्दर्शनाखाली सोमा टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे चांदवडचे व्यवस्थापक के. सुरेशराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदवड : येथील सोमा टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत चांदवड येथील मुंबई - आग्रा महामार्गावरील राष्टÑीय महामार्ग क्रमांक ३ वरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्षअनंत सूर्यवंशी यांच्या मागर्दर्शनाखाली सोमा टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे चांदवडचे व्यवस्थापक के. सुरेशराव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चांदवड टोल प्रशासनाला इशारा देण्यात आला की, येत्या सात दिवसात खड्डे न बुजवल्यास मनसे खड्ड्यात वृक्षारोपण करणार आहे. याप्रसंगी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नाना विसपुते, तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, नितीन थोरे, दिगंबर राऊत, परवेज पठाण, वैशाली सोनवणे, श्रावण जाधव, किशोर चौबे, रवींद्र बागुल, भोला क्षत्रिय, पंकज गोसावी, श्रीहरी ठाकरे, अॅड. अशोक देवरे, योगेश पाटील, भागवत झाल्टे, विकास गोजरे, चेतन पगार, तन्वीर पटेल, संजय बनकर आदी उपस्थित होते.