राजेंनी सर्व समाजाचा विचार करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:48 IST2020-10-10T21:25:32+5:302020-10-11T00:48:50+5:30
नाशिक: राजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद थांबवावेत असे मतही व्यक्त केले आहे.

राजेंनी सर्व समाजाचा विचार करावा
नाशिक: राजे हे कोणा एका समाजाचे व धर्माचे नसतात तर ते सर्व जनतेचे राजे असतात. त्यामुळे त्यांनी सर्व समाजाचा विचार करावा, असा टोला राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीराजे यांना लगावला. त्याच बरोबर सध्या सुरू असलेले शाब्दिक वाद थांबवावेत असे मतही व्यक्त केले आहे.
सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावर संभाजीराजे यांनी तलवार काढू या वक्त्यव्याने वाद सुरू असून त्यावर पत्रकार परिषदेत बोलताना भुजबळ यांनी, राजे तलवारीचा उपयोग ओबीसी वर करतात की आदिवासीवर हा प्रश्न उपस्थित होत असून, मराठा-ओबीसी हे भांडण आता थांबायला हवे, तलवारी नाही पण शब्दांची खणखण देखील थांबायला हवी अशी भूमिकाही त्यांनी मांडली. एमपीएससीच्या परीक्षा रद्द करू नये ही बहुजन समाज विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांची भूमिका रास्तच होती. ते स्वत: त्या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांचे बोलणे समजून घेतले जाव,े असे सांगून भुजबळ यांनी वडेट्टीवार यांचे समर्थन केले. एमपीएससी परीक्षा रद्द करू नये हे माझे व्यक्तीगत मत आहे, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जास्त काही बोलता येणार नाही. पण परीक्षा झाली पाहिजे असे काहींचे म्हणणे होते. आता पुन्हा परिक्षेबाबत आयोग व मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
सुशांतप्रकरणी राजकारण
सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत असल्याने काही लोक राजकारण करण्यासाठी राज्यात काही तरी झाले पाहिजे अशा प्रयत्नात आहेत. अशा वेळी राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी सर्वांनीच घेण्याची गरज असल्याचे सांगून भुजबळ यांनी, महाराष्ट्रातील कांद्याला निर्यात बंदी लादून केंद्र सरकार दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला.