कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:32 PM2019-08-10T22:32:32+5:302019-08-10T22:33:00+5:30

सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: कीर्तांगळी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kirtangali Village Parliament Selection for Adarsh Gram Yojana | कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड

कीर्तांगळी गावाची संसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामस्थांमध्ये समाधान । गावातील बचतगटांचे सक्षमीकरण होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : केंद्रीय संसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांनी सिन्नर तालुक्यातील कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. निवडणूक झाल्यानंतर पहिल्याच टप्प्यात खासदार गोडसे यांनी आदर्श ग्राम योजनेंतर्गत गावाची निवड केल्याने सिन्नर तालुक्यात विशेषत: कीर्तांगळी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
येत्या वर्षभरात आदर्श ग्राम योजनेंतर्गत कीर्तांगळी गावात विविध योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. आदर्श ग्राम योजनेंतर्गत कीर्तांगळी गावाची निवड व्हावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून सरपंच दगू चव्हाणके, उपसरपंच प्रभाकर चव्हाणके, सुदर्शन राष्टÑ निर्माणचे अध्यक्ष सुरेश चव्हाणके, प्रमोद चव्हाणके, संपत चव्हाणके, मोहन चव्हाणके, संजय चव्हाणके, नानासाहेब चव्हाणके, रामदास चव्हाणके, सुदाम चव्हाणके, नवनाथ चव्हाणके, दीपक साळवे, बाबूराव कांडेकर, दीपक चव्हाणके, किरण कांडेकर, अशोक शिरोळे, दत्तू चव्हाणके, सुनंदा चव्हाणके, स्मिता चव्हाणके, सपना घुले, नवनाथ घुले, शीला साळवे, कल्पना चव्हाणके आदींनी खासदार गोडसे यांच्याकडे साकडे घातले होते.
कीर्तांगळीकरांच्या भावना लक्षात घेऊन गोडसे यांनी पहिल्याच टप्प्यात संसद आदर्श गाव योजनेसाठी कीर्तांगळी गावाची निवड केली आहे. याविषयाचे पत्र गोडसे यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले आहे. विविध योजनांतून होणार विकास
यामुळे गावात देवस्थान असलेल्या संत हरिबाबा देवस्थानचा सर्वांगीण विकास होणार असून, शाळेचे डिजिटलायझेशन, अंतर्गत रस्ते, दशक्रिया विधी मंडप, पथदीप, आरोग्य तसेच कृषी योजना राबविण्यात येणार आहे. नदी घाटाचा कायापालट होणार असून, गावातील बचतगटांचे सक्षमीकरण होणार आहे. गोडसे यांनी पहिल्याच टप्प्यात आदर्श ग्राम योजनेत कीर्तांगळी गावाचा समावेश केल्याने गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Kirtangali Village Parliament Selection for Adarsh Gram Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.