किसान क्रांतीचे ‘देता की जाता’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:45 AM2019-01-07T01:45:53+5:302019-01-07T01:51:49+5:30
नाशिक : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, हमीभाव, दुधाला वाढीव दर, शेतकरी पेन्शन योजना, जेनेटिक कृषी सेवा केंद्राला गत दीड वर्षापूर्वी आश्वासन देऊन यापैकी एकही मागणी पूर्ण न करणाºया भाजपा-शिवसेना युती सरकारच्या विरोधात किसान क्रांतीतर्फे येत्या १५ जानेवारीपासून राज्यभर ‘देता की जाता’ आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी (दि़ ६) औरंगाबाद महामार्गावरील मंगल कार्यालयात झालेल्या राज्य समन्वय समिती पदाधिकाºयांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती धनंजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली़

किसान क्रांतीच्या समन्वयकांसोबत २ जून २०१७ रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती़ या बैठकीत किसान क्रांतीने केलेल्या साडेसात एकर कोरडवाहू व पाच एकर बागायती शेतजमीन असलेल्या शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमाल हमीभाव कायदा, दुधाला २६ रुपये दर, साठ वर्ष वयापुढील शेतकºयांना पेन्शन, शेतीच्या ठिबक सिंचन योजनेला संपूर्ण अनुदान, सक्षम पीकविमा योजना, जेनेटिक कृषी सेवा केंद्र, सॅटेलाईट मॅपिंगद्वारे शेतकºयांना आगाऊ पिकांची माहिती यांसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र गत दीड वर्षात यापैकी एकही मागणी पूर्ण झालेली नाही़
शेतकºयांना आश्वासन देऊनही त्याची पूर्तता न करणाºया सरकारविरोधात १५ जानेवारीपासून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे़ या आंदोलनाची सुरुवात संक्रांतीला पुणतांबा येथील ज्ञानमाता मुक्ताई सभागृहात ज्योत प्रज्वलित करून केली जाणार आहे़ बैठकीस धनंजय जाधव, संदीप डिब्बे, जयाजी सूर्यवंशी, शंकर दरेकर, योगेश रायते, प्रदीप बिन्नोरे, सचिन कानवडे, सुदाम वहाडणे, शरद बोºहाडे आदी उपस्थित होते़